रेल्वेतील Sleeper, AC Coach सर्वांना माहित असतात, पण M Coach म्हणजे काय?

अनेकदा आपल्याला लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर आपण रेल्वे हा उत्तम पर्याय आहे असं म्हणतो आणि रेल्वेने प्रवास करतो.

रेल्वेतील Sleeper, AC Coach सर्वांना माहित असतात, पण M Coach म्हणजे काय?

अनेकदा आपल्याला लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर आपण रेल्वे हा उत्तम पर्याय आहे असं म्हणतो आणि रेल्वेने प्रवास करतो. तसेच त्यावेळेस आपण आपले सीट आरक्षित करतो म्हणजे तिकीट बुक करतो. कोणत्याही एक्स्प्रेस रेल्वेमध्ये विविध श्रेणीचे कोच असतात, ज्यासाठी प्रवासी आपापल्या गरजेप्रमाणे तिकीट बुकींग करतो. आतापर्यंत आपण कोणत्याही रेल्वेमध्ये SL, 1A, 2A, 3A, 2S आणि CC श्रेणींचे कोच पाहिले असतील. पण अलीकडच्या काही रेल्वेंमध्ये एक नवीन प्रकारचा कोचदेखील जोडल्याचं दिसत आहे. ज्यावर M1, M2 असं लिहिलेलं असतं. हे नेमकं काय आहे तुम्हाला माहित आहे का?

२०२१ मध्ये, भारतीय रेल्वेने AC – 3 म्हणजेच 3A श्रेणीचे कोच चांगल्या सुविधांसह रेल्वेला जोडले आहेत. हाच डब्बा M कोच म्हणून ओळखला जातो. ही सुविधा अद्याप काही गाड्यांमध्येच उपलब्ध आहे. कोणताही प्रवासी AC – 3 इकॉनॉमी कोचचे तिकिट बुक करू शकतो. ज्या रेल्वेत AC – 3 इकॉनॉमी कोच असतात त्या रेल्वेत AC – 3 नसतात. त्यामुळे ज्यांना AC – 3 मधून प्रवास करण्याची इच्छा असेल, त्यांना AC – 3 इकॉनॉमीचं तिकिट बूक करावं लागतं. या कोचमध्ये काही जास्तीच्या सुविधा मिळतात. मात्र, या कोचचं प्रवास भाडंही काही प्रमाणात अधिक असतं. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत अवघ्या काहीच रेल्वेंमध्ये अशाप्रकारचे कोच जोडण्यात आले आहेत.

रेल्वेतील जुन्या AC – 3 टीयरच्या तुलनेत AC – 3 इकॉनॉमी कोच नवीन आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. या कोचची रचना पूर्वीपेक्षा अद्ययावत केली आहे. AC – 3 इकॉनॉमी कोचमधील प्रत्येक आसनावरील प्रवाशासाठी एसी डक स्वतंत्रपणे लावण्यात आला आहे. तसेच प्रत्येक आसनासाठी बॉटल स्टँड, रीडिंग लाईट आणि चार्जिंगची व्यवस्था केली आहे. ज्या रेल्वेत AC – 3 टीयर कोच असतात, त्या रेल्वेत एसी-३ इकॉनॉमी कोच नसतात. एसी-३ च्या नवीन डब्यांना AC – 3 इकॉनॉमी नाव देण्यात आलं आहे. AC – 3 मध्ये ७२ आसनं आहेत, तर AC – 3 इकॉनॉमीमध्ये ११ अधिक आसनं देण्यात आली आहेत. ज्यामुळे यात एकूण ८३ आसनं आहेत.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरच मनोज जरांगेंच्या भाषेचा दर्जा घसरतोय, सकल मराठ्यांची चिंता

पंकज त्रिपाठीच्या कडक सिंह चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version