सर्वांचा आवडता ‘वडापाव’ झाला ५६ वर्षांचा…

आज २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… (World Vada Pav Day) असाही दिवस असतो याववत जर तुम्हाला शंका असेल तर हो असाही दिवस साजरा केला जातो.

सर्वांचा आवडता ‘वडापाव’ झाला ५६ वर्षांचा…

आज २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… (World Vada Pav Day) असाही दिवस असतो याववत जर तुम्हाला शंका असेल तर हो असाही दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोकांनी पहिल्यांदा वडापावची चव चाखली होती आणि मुंबईत (Mumbai) सुरु झालेलं हे स्ट्रीट फूड पाहता पाहता संपूर्ण जगात प्रसिद्ध झालं. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनी वडापावची चव चाखली आहे. वडापाव न आवडणारी व्यक्ती तशी दुर्मिळच आहे. आज वडापाव हे खाद्यपदार्थ संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे पण मुंबईकराइतके वडापावचे महत्त्व हे कदाचित बाकी कुणाला समजणार नाही. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव असतो.

१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असे मानले जाते. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. आज वडापावची इतक्या वर्षांची यशस्वी परंपरा मुंबईला लाभली आहे. मुंबईच्या खाद्यसंसकृतीचा तो एक भाग बनला. गरीबांनाही परवडेल अशा दरात वडापाव मिळत असल्याने तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आणि त्याची ख्याती सर्वदूर पसरली. मुंबईत वडापावची सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत अगदी १० पैसे इतकी होती. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो.

मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली. १९७० ते १९८० च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या. त्यानंतर मुंबईच्य गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. यादरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असे धोरण घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आलेली गोष्ट. महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवले.

आज वडापाव हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. मुंबई वडापाव हा खाद्यपदार्थ हा परदेशातून आलेल्या पर्यटकांना सुद्धा आवडतो. मुंबईत अनेकजण ऑफिसला जाताना वडापाव खातात. ऑफिसवरून परत घरी जात असतांना भूक लागली असेल, तर वडापाव खाऊन आपली भूक मिटवितात. आज मुंबईत दिवसाला जवळपास 18 ते 20 लाख वडापाव खपतात.

मुंबईमध्ये कीर्ती कॉलेजजवळचा अशोक वडापाव, आराम वडापाव, श्री कृष्णा बटाटावडा, मामा काणे, आस्वाद, चेंबूर जीमखाना, किर्ती वडापाव प्रसिद्ध आहेत तर ठाण्यामध्ये कुंजविहार, गजानन वडापाव, राजमाता वडापाव, दुर्गा वडापाव, संतोष वडापाव प्रसिद्ध आहेत.

तुम्हाला कोणता वडापाव आवडतो? कमेन्ट करुन नक्की कळवा.

 

हे ही वाचा :-

आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे 5 नियम

गणेश चतुर्थीनिमित्त पूजा विधी, व्रत विधी आणि विशेष मंत्र जाणून घ्या महत्वाची माहिती

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
Exit mobile version