spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानवर जीवघेणा गोळीबार हल्ला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समोर आलं असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला आहे. पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह राजधानीकडे निघाले आहेत. ४ नोव्हेंबरला हा मोर्चा इस्लामाबादला पोहोचणार आहेत. त्यातच आज ३ नोव्हेंबर रोजी ‘हकीकी आझादी मार्च’ हा मोर्चा वजिराबाद शहरात पोहचला. जफरअली खान चौकात हा मोर्चा आला असताना गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत अन्य चार जण जखमी झाले आहेत.

 हल्लेखोराने एके-४७ या बंदुकीतून गोळाबार केला आहे. गोळीबाळानंतर एकच गदारोळ उडाला होता. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. हल्ल्यानंतर इम्रान खान यांना बुलेटप्रूफ मोटारीतून तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर आता पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे सरकार आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेविरोधात इम्रान खान यांनी मोर्चा खोलल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना हा एक प्रकारचा इशारा असल्याचं बोललं जातंय.

हे ही वाचा :

कोल्हापुरात मनी लॉन्ड्रिंगच्याच पैश्याची लूट

चार पोलिसांनी जोरात धक्का दिला, त्यामुळं मी खाली पडलो – नितीन राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss