पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानवर जीवघेणा गोळीबार हल्ला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानवर जीवघेणा गोळीबार हल्ला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समोर आलं असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला आहे. पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह राजधानीकडे निघाले आहेत. ४ नोव्हेंबरला हा मोर्चा इस्लामाबादला पोहोचणार आहेत. त्यातच आज ३ नोव्हेंबर रोजी ‘हकीकी आझादी मार्च’ हा मोर्चा वजिराबाद शहरात पोहचला. जफरअली खान चौकात हा मोर्चा आला असताना गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत अन्य चार जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा :

कोल्हापुरात मनी लॉन्ड्रिंगच्याच पैश्याची लूट

चार पोलिसांनी जोरात धक्का दिला, त्यामुळं मी खाली पडलो – नितीन राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version