spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

EXCLUSIVE: लता एकनाथ शिंदे; Shrikant Shinde फक्त निवडूनच येणार नाही तर मंत्रीदेखील होणार!

आजच डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण- डोंबिवली मधून उमेदवारीसाठीचा अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी भव्य प्रचार रॅली देखील आयोजित केली होती. या शक्तिप्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार व देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांनी सहकुटुंब जाऊन उमेदवारीसाठीचा अर्ज भरला. यावेळी त्यांच्या आई लता एकनाथ शिंदे देखील उपस्थित होत्या.

डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण – डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीचा अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी भव्य प्रचार रॅली देखील आयोजित केली होती. या शक्तिप्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार व देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांनी सहकुटुंब जाऊन उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी त्यांच्या आई लता एकनाथ शिंदे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी, टाइम महाराष्ट्र चे संपादक राजेश कोचरेकर यांनी लता एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. श्रीकांत शिंदे यांनी भरलेल्या उमेदवारीच्या अर्जावर त्यांनी भाष्य केले.

श्रीकांत शिंदे सध्या हॅट्रिक करण्याच्या मार्गावर आहेत. तर आई म्हणून तुम्हाला काय वाटत असा प्रश्न विचारला असता लता शिंदे म्हणाल्या, “रॅली पाहूनच आम्हाला खूप समाधान वाटलं. जनतेचा कौल अगदी बरोबर झाला. बहुमताने श्रीकांत आता निवडून येणार. समर्थकांचा आणि लोकांचा आशीर्वाद तसेच सर्व जनतेचा आशीर्वाद श्रीकांतच्या पाठीमागे आहे. आणि तो निवडून आला आहे. निवडायची गरज नाहीये.”

एकवेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी आणि श्रीकांतची आई या दोन्ही भूमिका निभावताना तुम्हाला काय वाटत? यावर त्या म्हणाल्या, “मला आवड आहे. या गोष्टीचा मला कसलाही त्रास होत नाही. दोन्ही भूमिका राबवण्याची मला आवड आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची राजकारणाची भूमिका निभवायची असते तेव्हा मी घराबाहेर असते. एका आईची भूमिका मी घरातूनच पार पडते. दोन्ही भूमिका मी काटेकोरपणे पार पडते यात मला सगळ्या जनतेचा, कार्यकर्त्यांचा आशीर्वाद मला मिळतो.”

‘ एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या कामामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? दोघांची काम करण्याची पद्धत कशी आहे?’ असे विचारल्यानंतर लता शिंदे म्हणाल्या, एकनाथ शिंदे काम करतात पण कुणाला माहीतही पडणार नाही असं काम ते करतात. आणि श्रीकांत सुशिक्षित आहे तो प्रत्येक काम व्यवस्थितपणे पार पडतो. तो मिळूनमिसळून काम करतो. एकनाथ काय असेल ते डोक्यात ठेवतात आणि नंतर ते काम करतात. एकनाथ शिंदेंचा स्वभाव हा वेगळा आहे. गेली ४० वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांना सर्व राजकारण माहिती आहे. श्रीकांत गेली काही वर्षेच राजकारणामध्ये आहे. तो जिंकून आला तेव्हा सर्वांनीच पाहिलं. तो तर जिंकलेलाच आहे.’

जेव्हा लता शिंदेंना श्रीकांत शिंदे मंत्री होतील का? असा प्रश्न केला यावर त्या म्हणाल्या, “जरूर होणार, कसा नाही होणार? पुढे त्या म्हणाल्या जी लोक मागे बोलतात त्यांनी समजून जावं मला काय बोलायचंय ते. एका आईच हृदय आहे हे. आई म्हणून मी त्याला हेच सांगेल, जसे तुझे वडील बोलतात ज्यांना बोलायचं ते बोलूदे आपण कामातून उत्तर देऊयात. तू फक्त कामातून उत्तर देण्यावर भर दे. आणि श्रीकांतने मागच्या १० वर्षात काय उत्तर द्यायचं ते त्याच्या कामातून दिल आहे. मला सांगायची देखील गरज नाहीये सर्व जनतेला ते माहित आहे. त्यानी आज सर्वकाही करून दाखवलं आहे ते हि स्वतःच्या पायावर उभा राहून.”

हे ही वाचा:

संविधानाला संघ आणि मोदींपासून नाही तर विरोधकांपासून धोका, महाराष्ट्र मोदींसोबतच!

त्यांच्या कार्यअहवालात अजित दादांचं काम दिसतं, Chitra Wagh यांचा Supriya Sule यांच्यावर घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss