spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Facebook Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय, फेसबूकमधील तब्बल ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

ट्विटर (Twitter) पाठोपाठ फेसबुकच्या (Facebook) कर्मचाऱ्यांवरही (Employees) कपातीची कुऱ्हाड कोसळलीच. कोणत्याही टेक कंपनीने घेतला नसेल असा हादरवणारा निर्णय फेसबुकने घेतला आहे. जगात सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.

ट्विटर (Twitter) पाठोपाठ फेसबुकच्या (Facebook) कर्मचाऱ्यांवरही (Employees) कपातीची कुऱ्हाड कोसळलीच. कोणत्याही टेक कंपनीने घेतला नसेल असा हादरवणारा निर्णय फेसबुकने घेतला आहे. जगात सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाने बुधवारी सांगितले की, कंपनी वाढत्या खर्च आणि कमी झालेल्या जाहिरात, यामुळे कंपनी बाजारपेठेशी झुंजत असल्याने या वर्षी कर्मचारी कपात करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडिया (Social Media) जगतात एकच खळबळ उडाली आहे.

फेसबुकच्या अंतर्गत निर्णयाचा हा परिपाक मानण्यात येत आहे. एकाच दिवशी एवढ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविणाऱ्या फेसबुकने हा निर्णय एकाच दिवशी घेतला नाही. त्यामागे मोठी पार्श्वभूमी आहे. तज्ज्ञांच्या मते अतिउत्साह आणि चुकीचे निर्णय यामुळे फेसबूक गंटागळ्या खात आहे. त्यांचे अनेक निर्णय आत्मघातकी ठरले.

मंगळवारी फेसबुकची एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग खूप निराश होते. ही जी कर्मचारी कपात होत आहे. त्याला मीच जबाबदार असल्याचा दावा झुकरबर्गने केला. कंपनी झपाट्याने प्रगती करेल, या आशेवर अनेक लोकांना कामावर घेण्यात आले. पण हा निर्णय आत्मघातकी ठरला. कंपनीने ११००० कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ केला. या कर्मचाऱ्यांना एका फटक्यात रस्त्यावर आणले. मेटा हा प्रकल्प सुरु करताना, तो यशस्वी होण्यासाठी कमीत कमी १० वर्षे लागतील, असे संकेत झुकरबर्गने दिले होते. आता कर्मचारी कपातीनंतर नवीन कर्मचारी भरतीवर बंधन आली आहेत. तसेच खर्च कपातीवर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे.

कर्मचारी कपात केल्यानंतर मार्क झुकरबर्ग याने कर्मचाऱ्यांना एक संदेश पाठून सॉरी म्हणाला आहे. तो आपल्या संदेशात म्हणाला आहे की, “ऑनलाइन कॉमर्स पूर्वीच्या स्थितीत परतला आहे, तर मॅक्रो इकॉनॉमिक मंदी, वाढलेली स्पर्धा आणि जाहिरात-सिग्नलचे नुकसान यामुळे आमचा महसूल अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे.” तो पुढे म्हणाला की “माझ्याकडून चूक झाली आणि मी त्याची जबाबदारी घेतो. मला माहित आहे की, हे प्रत्येकासाठी कठीण आहे आणि मला विशेषतः ज्यांची नोकरी गेली त्यांच्यासाठी वाईट वाटत आहे.”

जाहिरातीतून मोठी कमाई होईल, महसूल प्राप्त होईल, ही आशा फोलच ठरली. या आघाडीवर फेसबुकला मोठा झटका बसला. त्यामुळे संकटात सापडलेल्या फेसबुकसमोर कर्मचारी कपातीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.मेटवर्स सुरु केल्यापासूनच फेसबुकला संकटाची चाहुल लागली होती. मेटाचा शेअर यावर्षातच ७२ टक्क्यांनी घसरला आहे. अमेरिकन शेअर बाजारात मेटाची कामगिरी सर्वात नीच्चांकी ठरली आहे. मेटाच्या शेअरमध्ये वर्षभरात ६७ अरब डॉलरची घसरण झाली आहे.

हे ही वाचा :

Sanjay Raut : राऊतांच्या जामिनाची बातमी कळताच उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले संजय…

जेलमधून बाहेर पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘आम्ही लढणारे आहोत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss