spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Father’s Day 2023: पितृदिनानिमित्त या ठिकाणी करा बाबांसोबत Time Spent

फादर्स डे हा पाशात्य संस्कृतीत साजरा केला जाणारा वडिलांचा दिवस मागील काही वर्षांपासून भारतात देखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हा दिवस आपल्या वडिलांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.

फादर्स डे हा पाशात्य संस्कृतीत साजरा केला जाणारा वडिलांचा दिवस मागील काही वर्षांपासून भारतात देखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हा दिवस आपल्या वडिलांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. मात्र प्रत्येकाची हा दिवस साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. काहीजण आपल्या वडिलांना या दिवशी भेटवस्तू देतात तर काहीजण हा दिवस केक (Cake) कापून साजरा करतात. मात्र या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपल्या वडिलांसोबत वेळ घालवता येत नाही. म्हणूनच तुम्ही या दिवशी खास वडिलांसाठी वेळ काढून त्यांच्या सोबत वेळ घालवू शकता अथवा त्यांना फिरायला नेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. फादर्स डे हा दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी फादर्स डे हा १८ जून रोजी साजरा केला जाणार आहे. वडिलांसोबत टाइम स्पेंट करण्यासाठी तुम्हाला आज आम्ही काही भन्नाट जागा सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या जागा आहेत तरी कोणत्या?

रेस्टारंट (Restaurant)

तुम्हाला जर वडिलांसोबत चांगला वेळ घालवायचा असेल तर तुम्ही त्यांना कोणत्याही चांगल्या रेस्टोरंट मध्ये घेऊन जाऊ शकता. वडील नेहमीच स्वतःच्या आवडीनिवडी सोडून आपल्या मुलांच्या आवडी जोपासतात. मात्र या दिवशी तुम्ही वडिलांच्या आवडीचे पदार्थ खाऊन त्यांच्यासोबत गप्पा मारू शकता.

समुद्रकिनारा (beach)

प्रत्येक सुट्टीच्या दिवशी वडील आपल्या मुलांना नेहमीच बाहेर फिरण्यास घेऊन जातात. या फादर्स डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या वडिलांना समुद्रकिनारी फिरण्यास घेऊन जाऊ शकता. समुद्रकिनारी जाऊन काही वेळ पाण्यात पाय बुडवून तुम्ही तहानगर वाळूवर बसून सूर्यास्त देखील पाहू शकता. अथांग समुद्राच्या समोर बसून तुम्ही बाबांशी अनेक गोष्टींवर गप्पा मारू शकता.

हिल स्टेशन (Hill station)

फादर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांसोबत हिल स्टेशनवर जाऊ शकता. यासोबतच बाबांसोबत तुमची छोटीशी पिकनिक सुद्धा होईल.

ट्रेक (Trek)

तुमच्या वडिलांना जे ट्रेक ची आवड असेल तर तुम्ही त्यांना ट्रेक साठी घेऊन जाऊ शकता. आपण अनेकदा मित्रमैत्रिणींसोबत ट्रेक ला जातो. मात्र यावर्षी फादर्स डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बाबांसोबत ट्रेक ला जाऊ शकता.

चित्रपटगृह अथवा नाट्यगृह (Cinema or theater)

तुमच्या वडिलांना जर सिनेमा अथवा नाटकाची आवड असेल तर तुम्ही त्यांना चित्रपटगृहात अथवा नाट्यगृहात घेऊन जाऊ शकता. कामाच्या व्यापामुळे काहीवेळेस आपल्याला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघता येत नाही. मात्र फादर्स डे च्या निमित्ताने तुम्ही वडिलांना घेऊन सिनेमा अथवा नाटक पाहायला जाऊ शकता.

हे ही वाचा:

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता Chris Hemsworth आरआरआर चित्रपटाच्या प्रेमात

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss