spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Festival holidays : बच्चे पार्टीसाठी खुशखबर, ऑक्टोबर महिना घेऊन येतोय तब्बल १० दिवसांची शालेय सुट्टी

ऑक्टोबर महिना दिवाळी आणि दसऱ्याच्या सणासोबत खूप दिवसांच्या सुट्ट्यांची भेट घेऊन येत आहे. शालेय शिक्षण विभागाने दिवाळी आणि दसऱ्याला दहा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. रविवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपासून सुट्टीच्या या फेरीची सुरुवात होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये शनिवार आणि रविवारसह ११ दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

हेही वाचा : 

Vikram Vedha: सैफ अली खानने आर माधवनसोबत होणाऱ्या तुलनांवर दिली प्रतिक्रिया म्हणाला…

राज्यात ठिकठिकाणी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ऑक्टोबर महिना आनंदाची बातमी घेऊन येत आहे. शालेय शिक्षण विभागाने दसरा आणि दिवाळीच्या सुट्या जाहीर केल्या आहेत. विभागाच्या आदेशान्वये ऑक्टोबरमध्ये दसऱ्याला ४ दिवस आणि दिवाळीला ६ दिवस सुट्टी असेल.

ऑक्टोबरमध्ये दहा दिवसांची सुट्टी

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दसरा सणानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांना ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत सुट्टी देण्यात येणार आहे, तर दिवाळीनिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांना २२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरपर्यंत सुटी देण्यात येणार आहे. म्हणजेच दसऱ्याला ४ दिवस आणि दीपावलीला ६ दिवस सुट्टी असेल.

India vs South Africa: केरळच्या ग्रीनफिल्ड मैदानात रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना

Latest Posts

Don't Miss