spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अखेर भारतात ‘चित्ता’ परतला, नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्ते अभयारण्यात सोडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या वाढदिवसानिमित्ताने नामीबियातून भारतात चित्ते आणण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या वाढदिवसानिमित्ताने नामीबियातून भारतात चित्ते आणण्यात आले आहेत. भारतातून (india) चित्ते लुप्त झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतात चित्त्यांची डरकाळी पाहायला मिळणार आहे. मध्यप्रदेशातील कूनो नॅशनल वन पार्कमध्ये (Kuno National senchuri) हे चित्ते सोडण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हे चित्ते अभारण्यात सोडण्यात आले आहेत. तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये ४ मादी आणि ३ नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या नव्या पाहुण्यांचे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

 आज भारतात आणलेल्या चित्त्यांसमोर काही आव्हानं असतील. चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल. चित्त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे ७४८ चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येईल. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, असे अनेक प्रश्न आहेत. या सर्व निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.

नामिबियातून आठ चित्ते आज भारतात आणण्यात आले आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत. सलग २० तासांत ८,००० किलोमीटरचे अंतर कापून चित्ते भारतात पोहोचले आहेत. ग्वाल्हेरहून चित्त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलं जाईल. नामिबियाहून विशेष बोईंग ७४७-४०० विमानानं ग्वालेर, मध्य प्रदेश येथे चित्त्यांचं आगमन झालं आहे. तसेच नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं (CCF) एक पथक चित्त्यांसोबत आहे.तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चित्ते कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात येतील.आजपासून चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

“चित्ता आणा किंवा सिंह, आम्हाला आमच्या हक्काचा वाटा हवा” बागचा ग्रामस्थांचा त्यांच्या हक्कांसाठी लढा

…म्हणून चित्त्यांसाठी करण्यात आली मध्यप्रदेशातील ‘ कुनो ‘ ठिकाणाची निवड

PM Narendra Modi Birthday 2022 : पंतप्रधानांच्या ७२ व्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छांचा वर्षाव, वाचा कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss