कझाकस्तानच्या जंगलामध्ये अग्नीतांडव, १४ जणांचे मृतदेह सापडले

कझाकस्तान (Kazakhstan) या देशामधील जंगलामध्ये सध्या अग्नीतांडव सुरु झाला आहे. या आगीमुळे जंगलामध्ये असणाऱ्या अनेक पशु-पक्ष्यांचा जीव गेला आहे.

कझाकस्तानच्या जंगलामध्ये अग्नीतांडव, १४ जणांचे मृतदेह सापडले

कझाकस्तान (Kazakhstan) या देशामधील जंगलामध्ये सध्या अग्नीतांडव सुरु झाला आहे. या आगीमुळे जंगलामध्ये असणाऱ्या अनेक पशु-पक्ष्यांचा जीव गेला आहे. एवढेच नाही तर जंगलामध्ये राहणारी मानवी वस्ती देखील बरखास्त झाल्या आहेत. आतापर्यत कझाकस्तानच्या जंगलामध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अग्निशमन दलाची जवळपास एक हजार पथकं ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या उत्तर-पूर्व भागामधील जंगलामध्ये ही आग लागली आहे.

आतापर्यत कझाकस्तानच्या जंगलाला लागलेल्या आगीमध्ये जवळपास ६०,००० जंगलाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. यामध्ये अनेक झाडे, पशु-पक्षी, मानवी वस्ती जाळून खाक झाली आहे. जंगलामध्ये अडकलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा देखील शोध सुरु झाला आहे. या आगीमधून आतापर्यत ३१६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. परंतु आता आगीमुळे तापमान वाढत चालले आहे आणि हवेची दिशा बदलल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे अशी माहिती समोर आली आहे.

या आगीमध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. यावर शनिवारी कझाकस्तानचे राष्ट्रपती कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाचे मंत्री युरी इलिन यांची हकालपट्टी देखील केली आहे. ८ जून रोजी पडलेल्या जंगलामध्ये ही आग लागली अशी माहिती मिळाली आहे. आतापर्यंत जवळपास १००० लोक ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनतर रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांनी कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांच्याजवळ दु:ख व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा, जयंत पाटील म्हणाले…

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्य परेशान हो सकता है लेकीन…

सु्प्रिया ताईंना अजितदादांची मदत मिळणार नाही? Will Ajit pawar support Supriya Sule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version