spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पहिली स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील

पहिली स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात (Indian Navy) सामील झाली आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) हि पहिली स्वदेशी युद्धनौका आहे. कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.

पहिली स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात (Indian Navy) सामील झाली आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) हि पहिली स्वदेशी युद्धनौका आहे. कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका (India Made Aircraft Carrier) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे हा सोहळा पार पडला. त्यानंतर आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत सामील झाली आहे.

व्हाईस अँडमिरल एसएन घोरमाडे म्हणाले की, २ सप्टेंबर हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. ४० हजार टन विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातील सहा निवडक देशांच्या पंक्तीत आता भारत सामील झाला आहे. उर्वरित पाच देश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत. व्हाईस अँडमिरलच्या मते, आयएनएस विक्रांतचा भारताच्या युद्ध ताफ्यात समावेश केल्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यास मदत होईल.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे हा सोहळा पार पडला. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.

आयएनएस विक्रांतवर ३० विमाने तैनात असतील. त्यापैकी २० लढाऊ विमाने आणि १० हेलिकॉप्टर असतील. सध्या विक्रांतवर मिग-२९ के लढाऊ विमाने तैनात केली जातील, अशी माहिती व्हाईस अँडमिरल घोरमाडे यांनी दिली आहे. त्यानंतर टीईडीबीएफ म्हणजेच दोन इंजिन डेकवर आधारित फायटर जेट डीआरडीओ आणि एचएएलद्वारे तैनात केले जातील. कारण TEDBF पूर्णपणे तयार होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात, यादरम्यान अमेरिकेची F-१८A सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल (M) तैनात केली जाऊ शकते. या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. घोरमाडे म्हणाले की, यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-२९ लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात होईल.

हे ही वाचा:

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप

लालबागच्या राज्याने केली भक्तांसाठी खास सोय

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss