आधी पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि आता बांग्लादेश ; चीनची धूर्त नीती भारतावर डाव साधण्याच्या प्रयत्नात?

आधी पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि आता बांग्लादेश ; चीनची धूर्त नीती भारतावर डाव साधण्याच्या प्रयत्नात?

भारत म्हंटल की अनेक गोष्टी लक्षात येतात. सध्या भारताची जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सैन्यशक्ती, आर्थिक क्षेत्रात वाढ त्याचप्रमाणे संपन्नता अशा प्रत्येक क्षेत्रात भारत प्रगती करत आहे. अमेरिका आणि युरोप यांसारखे मोठ्ये देश पूर्वी चीनमध्ये गुंतवणूक करत होते. कोरोनासारख्या महामारी नंतर त्यांनी भारतासह इतर सर्व देशांमध्ये गुंतवणुकीसाठी पसंती दर्शवलेली दिसत आहे. त्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. आधी नेपाळ, श्रीलंका, मालदीव, पाकिस्थान आणि आता बांग्लादेश अशी भारताच्या सीमांच्या दृष्टीने तेथे अराजकता माजवली आहे. ही चीनची चाल आहे का हा म्हत्वाचा प्रश्न आहे. याच उत्तर आपल्याला मिळेल पण भविष्यात. त्याआधी भारताने सावध होणे गरजेचे आहे. भारत सरकार चीनला चोख उत्तर देत असल्यानं त्यांचे भारतामधील प्रयत्न पूर्ण यशस्वी अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे चीन भारताच्या भोवती चक्रव्यूह रचतोय. त्यामध्ये भारताचे सर्व शेजारी देश त्याचे गुलाम होतील. ते चीनच्या इशाऱ्यावर कारभार करतील. भारताचे सर्व शेजारी देश अस्थिर आणि अशांत राहावे यासाठी चीन खटाटोप करत आहे. 

उदाहरण म्हणून बांग्लादेश हे ताज आणि उत्तम उदाहरण आहे. बांग्लादेशमध्ये स्वतंत्र निर्णय घेणारं सरकार होतं. त्या सरकारचे भारतासोबत उत्तम संबंध होते. चीन, अमेरिका आणि युरोपीयन देशांशी हे सरकार संबंध ठेवून होतं.  बांग्लादेशला चीनचं खेळणं करण्यास शेख हसीना तयार नव्हत्या. त्या त्यांच्या देशाच्या हिताचे निर्णय घेत होत्या. चीनला बांगलादेशमध्ये त्यांच्या मर्जीनं चालणारं सरकार हवं होतं. चीनच्या मित्रांना स्वत:चा मित्र आणि शूत्रांना शत्रू समजणारं सरकार बांगलादेशमध्ये स्थापन करण्याची चीनची योजना होती. शेख हसीना यांनी २६ जून २०२४ रोजी तीस्ता नदीवरील मोठा जलाशय तयार करण्याचं जाहीर केलं होतं. याबाबत सर्व प्रस्तावांचा विचार करुन देशाच्या विकासाला पूरक ठरेल तो प्रस्ताव स्वीकारणार असल्याचं हसीना यांनी जाहीर केलं होतं. हसीना यांचं स्वतंत्र वृत्तीनं कारभार करणं चीनला मान्य नव्हतं. 

चीनला बांग्लादेशात काय हवं आहे ? हे समजून घेण्यासाठी नेपाळमधील यापूर्वीच्या ओली सरकारकडं नजर टाकली असता लक्षात येईल. चीनच्या पाठिंब्यामुळेच केपी शर्मा ओली यांच्या मागील कारकिर्दीमध्ये भारत-नेपाळ संबंध कमालीचे बिघडले होते. भारत आणि नेपाळच्या नागरिकांमध्ये कटूता वाढत होती. आता ओली पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत. पण, यंदा त्यांच्याकडं पहिल्यासारखं बहुमत नाही. त्यानंतरही कोणत्याही परिस्थितीमध्ये ओली सत्तेवर राहावे यासाठी चीन प्रयत्न करत आहे. ओलीच्या माध्यमातून भारतावर नजर ठेवण्याची चीनची योजना आहे.

गोटबाया राजपक्षेंच्या माध्यमातून चीननं श्रीलंकेतील जमिनीवर कब्जा केला. कर्जाच्या जाळ्यात श्रीलंकेला अडकवलं. त्यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था गुदमरली. त्याचा परिणाम राजपक्षेंना सहन करावा लागला. श्रीलंकेचे नागरिकांना या उदाहरणामुळे धडा मिळाला. हे सर्व काही चीनमुळे झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. राजपक्षे सरकारनं भारताविरुद्ध अनेक निर्णय घेतले होते. नव्या सरकारनं हे संबंध सुरळीत करण्यासाचे प्रयत्न सुरु केले. श्रीलंका अडचणीत सापडल्यावर भारतानं सढळ हातांनी मदत केली होती. आज भारत आणि श्रीलंकेचे संबंध पुन्हा एकदा चांगले होऊ लागले आहेत. 

मालदीवमध्ये चीनचा हस्तक्षेप :

मालदीवमध्ये ही तेच करण्यात आलं. तेथील सरकारमध्ये चीननं हस्तक्षेप केला व एक प्रोपगंडा सरकारची स्थापना केली. ज्यातून भारताला त्रास होईल अशी भूमिका त्या सरकारनं घेतली परिणाम स्वरूप भारताने मालदीवला बहिष्कृत केले. त्याचा परिणाम तेथील अर्थव्यवस्थेवर झाला. हीच संधी साधत चीन ने थेतील अर्थव्यवस्था कर्ज देऊन स्वतःच्या ताब्यात घेतली. ज्यामुळे त्याचा फटका संपूर्ण मालदिवासीयांना होत आहे. 

पाकिस्तान हा चीनचा पहिलावहिला यशस्वी प्रयोग ठरला :

पाकिस्तान हा चीनचा पहिलावहिला यशस्वी प्रयोग ठरला. ज्यावेळी भारत आणि पाकिस्थान वेगळे झाले त्यावेळी पाकिस्तानी जनतेत भारताबद्धल द्वेष भावना जागृत होती. त्याभावनेला चीनने अधिक दृढ केले. पाकिस्तानला कर्जाच्या डोंगरात बुडवून स्वतःला जे हवं ते चीननं पाकिस्तान कडून करवून घेतले. यापूर्वी अमेरिका पाकिस्तानला मदत आर्थिक मदत करत असे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांकडंही अमेरिकेनं कानाडोळाही केला आहे. पण, पाकिस्ताननं अमेरिकेपेक्षा चीनला प्राधान्य दिलं. त्यामुळे अमेरिकेनंही मदतीचा हात आखडता घेतला आहे. घेतलेल्या कर्जाचे व्याजच अजून पाकिस्तान फेडू शकलेले नाही . ते फेडण्यासाठी IMF कड नाव कर्ज घेण्याच्या फिर्यादित पाकीस्तान आहे. या कर्जाच्या जीवावर चीननं पाकिस्तानला छिन्न-विच्छिन्न केले आहे. तेथील पाकव्याप्त काश्मीर बळकावले आहे. आता त्याची नजर पूर्ण काश्मीर आणि बलूचिस्तानवर आहे.  

हे ही वाचा:

Maratha Reservation मध्ये आली नवीन ट्विस्ट; फडणवीसांच्या भेटीनंतर Ramesh Kere Patil यांनी दिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray यांचा आज दिल्लीदौरा होणार सुरु; दरम्यान भेटणार ‘या’ महत्वाच्या नेत्यांना

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version