दिल्ली कार अपघातावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली कार अपघातावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Delhi Woman’s Death : काल दिल्लीमध्ये एक भयानक प्रकार घडला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीतील कांजवाला (Kanjwala in Delhi) येथे मुलीसोबत झालेल्या वेदनादायक अपघातानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, कांजवालामध्ये आमच्या बहिणीसोबत जे घडले ते अतिशय लज्जास्पद आहे. सीएम केजरीवाल म्हणाले, “मला आशा आहे की या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल.”

दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना (Vinay Saxena) यांनीही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे आणि याला अमानवी म्हटले आहे. कांजवाला सुलतानपुरी (Kanjwala Sultanpuri) येथे आज सकाळी घडलेल्या अमानवी गुन्ह्याने माझे डोके शरमेने झुकले आहे, असे ते म्हणाले. गुन्हेगारांच्या राक्षसी स्वभावाच्या असंवेदनशीलतेने मला धक्का बसला आहे. एलजी विनय सक्सेना यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना (Commissioner of Police) टॅग केले आणि सांगितले की, मी दिल्ली पोलिस आयुक्तांसह या प्रकरणावर लक्ष ठेवत आहे. आरोपींना पकडण्यात आले आहे. लेफ्टनंट गव्हर्नर यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे की, पीडितेच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जावी, याची खात्री केली जाईल. ते म्हणाले की, मी सर्वांना आवाहन करतो की संधिसाधूपणाचा अवलंब करू नका. अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाजासाठी एकत्र काम करूया.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विरोधात भाजपा आक्रमक, प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन

Urfi Javed चे चित्रा वाघ यांना आव्हान, मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version