Fitness Trainer Death, २१० किलो वजन उचलताना एका ३३ वर्षीय फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

Fitness Trainer Death, २१० किलो वजन उचलताना एका ३३ वर्षीय फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

इंडोनेशियामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडोनेशियामध्ये (Indonesia) ३३ वर्षीय प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा (Fitness Trainer) अपघातात मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे फिटनेस ट्रेनर जस्टिन विकी (Justyn Vicky) बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मान मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. न्यूज एशिया चॅनलने दिलेल्या रिपोर्टनुसार, १५ जुलै रोजी हा अपघात झाला. जस्टिन विकी इंडोनेशियातील बाली येथील जिममध्ये व्यायाम करत होता, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,जस्टिन विकी (Justyn Vicky) २१० किलो वजनी बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत होता, दुर्दैवाने तो त्याच्यावर अंगावर पडला आणि त्याची मान मोडली. या अपघाताशी संबंधित एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जस्टिन विकी खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना दिसत आहे. ३३ वर्षीय जस्टिन विकी (Justyn Vicky) एक फिटनेस इन्फ्लुएन्सर होता.

न्यूज एशियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, जस्टिन विकी (Justyn Vicky) २१० किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करत असताना त्याचा तोल गेला आणि बारबेलचे वजन मानेवर पडले आणि तो बसलेल्या स्थितीतच खाली पडला. बारबेलचे वजन मानेवर पडल्याने त्याची मान मोडली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. जस्टिन विकीच्या स्पॉटरने त्याचा तोल गमावल्याचे दिसते आणि घटनेदरम्यान तो त्याच्यासोबत मागे पडताना दिसतो. जस्टिन वेटलिफ्टिंग करत असताना त्याला मागच्या बाजूने त्याला वजन उचलण्यास मदत करायला व्यक्ती होती. पण, काही कळण्याच्या आधीच हा सर्व प्रकार घडला. अपघातामुळे त्याची मान तुटली आणि त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांना जोडणार्‍या महत्वाच्या मज्जातंतूंना गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज विजेतेपद जिंकताच अडकला लग्न बंधनात

Hidden Forts In Pune,पावसाळ्यात या किल्ल्यांना भेट द्यायला विसरू नका

Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version