शिक्षकदिनी यूजीसीकडून पाच नव्या अनुदान योजना

आज शिक्षकदिनी यूजीसीकडून (UGC) शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाचं काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पाच नव्या अनुदान आणि फेलोशिपची घोषणा केली आहे.

शिक्षकदिनी यूजीसीकडून पाच नव्या अनुदान योजना

आज शिक्षकदिनी यूजीसीकडून (UGC) शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाचं काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पाच नव्या अनुदान आणि फेलोशिपची घोषणा केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नवीन संशोधन अनुदान आणि फेलोशिप योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. आज याबाबत अधिकृत घोषणा होईल.

हे ही वाचा : फोडा-झोडा-मजा पहा… , सामनातून भाजपवर हल्लाबोल

आजपासून तीन संशोधन अनुदान आणि दोन फेलोशिप सुरू केल्या जाणार आहे. दुपारी ३ वाजता या योजनांचा शुभारंभ होणार आहे. यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, संशोधन अनुदान फॅकल्टी सदस्य आणि सेवारत शिक्षकांसाठी असेल. हे अनुदान तीन प्रकारचं असेल. तर फेलोशिप ही दोन प्रकारची असणार आहे.

१. UGC संशोधन अनुदान

२. निवृत्त प्राध्यापक सदस्यांसाठी फेलोशिप

या फेलोशिपचा उद्देश प्रोफेसर/सहयोगी प्रोफेसरच्या स्तरावर काम केलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय ६७ वर्षांपर्यंत असावं, त्यांनी १० पूर्ण-वेळ उमेदवारांच्या पीएचडी प्रबंधांचे यशस्वीपणे पर्यवेक्षण केलेले असावे, ज्यापैकी तिघांनी गेल्या १० वर्षांमध्ये त्यांच्या पदवी प्राप्त केल्या आहेत. अर्जदाराने मुख्य अन्वेषक म्हणून राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय एजन्सीद्वारे निधी उपलब्ध करून दिलेले किमान तीन प्रायोजित संशोधन प्रकल्प देखील हाताळलेले असावेत. या उमेदवारांना दरमहा ५०,००० फेलोशिप रुपये असेल आणि ही फेलोशिप १०० अर्जदारांसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. यामध्ये वार्षिक ५०,००० रुपयांची विशेष तरतूदही असेल.

हे ही वाचा :

दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा हा ‘शो’ले आहे, म्हणत श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांवर केला पलटवार

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करणार २५० कोटींचा खर्च

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version