सिक्कीममध्ये महापूर, ४८ तासांपासून नागरिक बोगद्यात अडकले

देशाच्या ईशान्येकडील राज्य सिक्कीममध्ये ढगफुटी (Sikkim Floods) झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.

सिक्कीममध्ये महापूर, ४८ तासांपासून नागरिक बोगद्यात अडकले

देशाच्या ईशान्येकडील राज्य सिक्कीममध्ये ढगफुटी (Sikkim Floods) झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे सिक्कीम मध्ये पूर आला आहे. या पुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच बोगद्यात अडकडल्या नागरिकांना बाहेर काढण्यात एनडीआरएफची (NDRF) टीमला यश आले आहे. सिक्कीमध्ये ३ ऑक्टोबर मंगळवारी अचानक रात्री ढगफुटी झाली आणि सिक्कीममधील नद्यांना पूर आला. या पुरात आता पर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून ९८ पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत.

सिक्कीममध्ये ढगफुटी झाल्यामुळे तेथील अनेक नद्यांना पूर आला आहे. नद्यांना पूर आल्यामुळे तेथील लोक मागील ४८ तासांपासून अन्न, पाण्याशिवाय बोगद्यात अडकून पडले आहेत. तसेच हे बोगदे पाण्याने भरले आहेत कि नाही तसेच बोगद्यात अडकलेले नागरिक सुखरूप आहेत कि नाही हे कोणालाच माहित नाही. शुक्रवारी (६ ऑक्टोबर) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची टीम या बोगद्यात सर्च ऑपरेशनला सुरूवात करणार आहे. ही टीम उत्तर सिक्कीममधील चुंगथांग येथे जाणार आहे, जिथे त्यांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.सिक्कीमचे मुख्य सचिव विजय भूषण पाठक म्हणाले, “चेक पोस्टवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, लाचेन आणि लाचुंगमध्ये सुमारे ३००० लोक अडकले आहेत. ७००-८०० ड्रायव्हर तेथे अडकले आहेत. मोटारसायकलवर गेलेले ३१५० लोकही तेथे अडकले आहेत.” आम्ही लष्कर आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सर्वांना बाहेर काढू. लष्कराने लाचेन आणि लाचुंगमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी इंटरनेटच्या माध्यमातून बोलायला लावले.”

बुधवारी अचानक आलेल्या पुरामुळे नागरीकाकांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. तसेच पुरामुळे चुंगथांग शहराचा सिक्कीमच्या काही भागातून संपर्क तुटला आहे. पॉवर लाइन्स खाली पडल्या, सेल टॉवर नष्ट झाले, पूल नष्ट झाले आहेत. रस्ते देखील वाहून गेल्यामुळे अनेक नागरिक अडकून पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संभाषणाचे साधन नसल्यामुळे नागरिकांचा शोध घेणे कठीण झाले आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version