spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक

सीबीआयकडून (CBI) आयसीआयसीआय (ICICI)बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना शुक्रवारी सीबीआयने व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या ₹३,००० कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित फसवणूक प्रकरणात शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक यांच्यासह व्हिडिओकॉन समूहाचे (Videocon Group) संचालक वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar) यांच्यावर आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावर असताना पदाचा गैरव्यवहार आणि मणी लॉन्डरिंग करण्याचा आरोप आहे.चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन समूहाचे संचालक वेणुगोपाल धूत यांना ICICI बँकेकडून ३,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज मंजूर केले. आणि वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांनी न्यूपॉवर रिन्युएबल्स मध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला होता, कारण तिच्यावर व्हिडिओकॉन ग्रुप (Videocon Group) या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि तेल आणि वायू शोध कंपनीची बाजू घेतल्याचा आरोप केला गेला होता.त्यामुळे चंदा कोचर यांचा राजीनामा आयसीआयसीआय बँकेकडून मंजूर करण्यात आला.

पण या पूर्वीही केंद्रीय एजन्सीने चंदा कोचर (Chanda Kochhar), त्यांचे पती आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे (Videocon Group) वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) , तसेच न्यूपॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमांतर्गत एफआयआरमध्ये आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला होता.आणि या प्रकरणात चंदा कोचर या सदस्य असलेल्या समितीने कर्ज मंजूर केले होते, असा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की तिने तिच्या अधिकृत पदाचा गैरवापर केला आणि “व्हिडिओकॉनला ₹ ३००० कोटी मंजूर केल्याबद्दल धूत यांच्याकडून तिच्या पतीद्वारे बेकायदेशीर समाधान/अवाजवी फायदा मिळवला .”

हे ही वाचा:

पालकचे जास्त सेवन करताय ? जाणून घ्या दुष्परिणाम

किडनीचे आरोग्य जपायचे ? मग ‘या’ सवयी बदला, आणि राहा समस्यांपासून दूर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss