फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून मोदींचे कौतुक, म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी योग्य बोलले”

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून मोदींचे कौतुक, म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी योग्य बोलले”

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७व्या उच्चस्तरीय अधिवेशनात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते म्हणाले, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या वार्षिक बैठकीच्या वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ही युद्धाची वेळ नाही. रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदींनी त्यावेळी हे वक्तव्य केले होते.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या २२वी वार्षिक परिषदेच्या निमित्ताने झालेल्या द्विपक्षीय चर्चेत मोदींनी युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान मोदींच्या या भूमिकेचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्वागत केलं आहे.

प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन म्हणाले…

फ्रान्सचे राष्ट्रपती म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी बरोबर सांगितले होते की, ही युद्धाची वेळ नाही. ही वेळ पाश्चिमात्यांवर सूड उगवण्याची किंवा विरोध करण्याची नाही. आपल्या सार्वभौम राष्ट्रांनी पुढच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे.

हिंगोलीमध्ये शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, युक्रेन संघर्षावर तुमची भूमिका मला माहीत आहे. मला तुमची चिंता समजते. मला माहित आहे की तुम्हाला या चिंता समजल्या आहेत. हे संकट लवकरात लवकर संपावे अशी आमची इच्छा आहे. पण दुसरा पक्ष- युक्रेन, त्यांना संवाद प्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही. ते म्हणतात की त्यांना युद्धभूमीवर त्यांचे ध्येय साध्य करायचे आहे. यासंबंधीच्या संपूर्ण उपक्रमाची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू.

अमेरिकाकडून मोदींच्या संदेशाचे कौतुक

युक्रेन युद्धावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या संदेशाचे अमेरिकेने कौतुक केले, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी मंगळवारी सांगितले. युद्ध लवकरात लवकर संपावे अशी अमेरिकेची इच्छा व्यक्त केली आहे.

लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, साडेतीन लाखांचा दंड आकारला

Exit mobile version