spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

अमेरिकेच्या यशस्वी दौर्‍यानंतर, PM मोदी शनिवारी दिनांक २४ जून त्यांच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर इजिप्तला पोहोचले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल-करीम आलम यांची भेट घेतली.

अमेरिकेच्या यशस्वी दौर्‍यानंतर, PM मोदी शनिवारी दिनांक २४ जून त्यांच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर इजिप्तला पोहोचले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल-करीम आलम यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि इजिप्तमधील मजबूत सांस्कृतिक संबंधांवरही चर्चा झाली. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर आज रविवार दिनांक २५ जून हा त्यांच्या इजिप्त दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आपल्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अल-हकीम मशिदीला भेट देतील तसेच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांची भेट घेतील.

आपल्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्यात, पंतप्रधान मोदी प्रथम भारतीय बोहरा दाऊदी समुदायाच्या मदतीने नूतनीकरण केलेल्या ११ व्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला भेट देतील. यानंतर पंतप्रधान मोदी हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीत जाऊन पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या ३,७९९ भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेणार आहेत.

दुसरीकडे, इजिप्तमध्ये पोहोचल्यानंतर पीएम मोदींनी ट्विट केले की, मला खात्री आहे की, या भेटीमुळे भारताचे इजिप्त सोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करण्यास आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे.” इजिप्तमध्ये आगमन झाल्यावर भारतीय वंशाच्या समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. हॉटेल रिट्झमध्ये भारतीय समुदायातील लोकही मोठ्या संख्येने होते. पंतप्रधान मोदींनी भारतीय डायस्पोरा यांचीही भेट घेतली. हातात तिरंगा घेऊन लोक वंदे मातरम, मोदी-मोदीच्या घोषणा देत होते. एवढेच नाही तर जेना नावाच्या मुलीने शोले चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणे पीएम मोदींच्या स्वागतासाठी गायले.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss