Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मायक्रसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सना मागे टाकत गौतम अदानी ठरले जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती

गौतम अदानी यांनी मायक्रसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत चौथ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार एकूण 115. 4 अब्ज डॉलर इतकी आहे गौतम अदानी यांची संपत्ती

फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारतीय उद्योजक आणि भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे गौतम अदानी यांनी मायक्रसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत चौथ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार एकूण 115. 4 अब्ज डॉलर इतकी गौतम अदानी यांची संपत्ती असल्यामुळे ते फोर्ब्सच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. बिल गेट्स आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत 11 अब्ज डॉलर इतका फरक असून, पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या बिल गेट्स यांची संपत्ती जवळपास 104.2 अब्ज डॉलर इतकी आहे.

बिल गेट्स यांच्या संपत्तीपैकी $20 अब्ज चॅरिटीला देत असल्यामुळे ते श्रीमंतांच्या यादीत एक स्थान घसरून पाचव्या स्थानावर आले आहेत. या यादीत टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 229 अब्ज डॉलर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फ्रेंच लक्झरी वस्तूंच्या कंपनीचे म्हणजे लुई विटोनचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट असून त्यांची एकूण संपत्ती 145 अब्ज डॉलर आहे. या यादीत अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावर असून बेझोस यांची एकूण संपत्ती 136 डॉलर अब्ज आहे.

भारतासोबतच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा टॅग दीर्घकाळ मिरवणारे मुकेश अंबानी हे फोर्ब्सच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. अंबानी यांची एकूण संपत्ती 88 अब्ज डॉलर आहे. तसेच फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्सनुसार, अंबानी-अदानी यांच्या संपत्तीत एकूण 26 डॉलर बिलियनपेक्षा जास्त अंतर असल्याचे समोर येत आहे. गेल्या 2 वर्षात अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये बरीच वाढ झालेली दिसून येते. 2021 साली गौतम अदानी यांनी आपल्या संपत्तीत सर्वात जास्त म्हणजे 49 अब्ज डॉलर्सची वाढ केल्याचे दिसून येते. संपत्ती वाढवण्याच्या बाबतीत अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे नाव अग्रस्थानी येते. 2022 मध्ये, त्यांची संपत्ती सुमारे $ 23 अब्जने वाढली आहे, जी जगातील सर्वाधिक आहे.

 

Latest Posts

Don't Miss