पारंपरिक पद्धतीने गे वेडिंग पार पडले; सोशल मीडियावर Viral Photo

पारंपरिक पद्धतीने गे वेडिंग पार पडले; सोशल मीडियावर Viral Photo

पारंपरिक पद्धतीने गे वेडिंग पार पडले; सोशल मीडियावर Viral Photo

सध्या संपुर्ण देशाचे लक्ष एका अनोख्या लग्नाने वेधून घेतले आहे. हे अभिषेक रे (Abhishek Ray) आणि चैतन्य शर्मा (Chaitanya Sharma) हे समलैंगिक (Gay Couple Wedding in Kolkata) जोडपं सध्या खूप चर्चेत आहे. यांनी कोलकत्ता येथे पारंपरिक पद्धतीने लग्न गाठ बांधली आहे. धूमधडाक्यात पार पडलेल्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी या नव्या जोडप्याला शुभेच्छा ही दिल्या आहेत.
विशेष म्हणजे या लग्नात मोठ्यांपासून अगदी लहान मुलांपर्यंत सगळे अगदी आनंदाने सहभागी झाल्याचे फोटो पाहून कळतंय. त्यामुळे कुटुंबाने आणि समाजाने LGBTQ+ समूहाला आता मुख्य प्रवाहात सामावून घेतले या गोष्टीचे सगळीकडे खूप कौतुक होत आहे. या विवाह सोहळा पंडितांच्या उपस्थितीत हिंदू पद्धतीने पार पडला. अभिषेक आणि चैतन्य नी अग्निसमोर फेरे ही घेतले. कोलकत्ता शहरात असा विवाह सोहळा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. परंतू हिंदु रितीरिवाजानुसार होणारे हे पहिलेच लग्न आहे.
https://www.instagram.com/p/CflShSXLaVG/?igshid=YmMyMTA2M2Y=
अभिषेक रे यांनी टाइम्स ऑफ इंडिया शी साधलेल्या संवादात सांगितलं की, LGBTQ+ बहुतेक जण लिव्ह इन मध्ये राहतात. किंवा घरात अगदी साधेपणाने लग्न करतात. पण आम्ही लग्न करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हाच मी चैतन्यला सांगितले की आपण अशा प्रकारे लग्न करायचे की त्या आठवणी सर्व कुटुंबीय आणि मित्रांना आयुष्यभर लक्षात राहतील. अभिषेक यांनी सांगितले की हे लग्न बंगाली आणि मारवाडी पध्दतीने झाले.
ज्या पंडितांनी हे लग्न लावले त्यांनी देखील हे लग्न प्रगतशील मानले. त्यांच्या मते हे नवं जोडपं अनेकांसाठी एक उत्तम उदाहरण ठरेल. त्यांच्या लिंग विशेषतेमुळे गुरुजींना मंत्र जप करताना अनेक अडचणी आल्या. दरम्यान अनेकांनी अभिषेक आणि चैतन्य ला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Exit mobile version