लष्करप्रमुखपदी General Upendra Dwivedi यांची लागली वर्णी

लष्करप्रमुख बनण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम केले होते. त्यांच्या नियुक्तीमध्ये सरकारने ज्येष्ठतेचे तत्त्व पाळले आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ अधिकारी दक्षिणेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (Ajay Kumar Singh) आहेत.

लष्करप्रमुखपदी General Upendra Dwivedi यांची लागली वर्णी

आज ३० जून रोजी म्हणजेच रविवारी जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. हे तब्बल ३० व्वे लष्करप्रमुख म्हणून आजचा पदभार त्यांनी स्वीकारला आहे. या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी ते लष्कराचे उपप्रमुख झाले होते. लष्करप्रमुख झाल्यावर द्विवेदी यांना लेफ्टनंट जनरलवरून जनरल पदावर बढती देण्यात आली आहे. भारत सरकारने ११ जून रोजी रात्री त्यांना लष्करप्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि लष्करातील इतर अनेक कमांडचे प्रमुख म्हणून काम केले आहे.

जनरल द्विवेदी यांनी जनरल मनोज पांडे यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. जनरल मनोज पांडे हे आजच निवृत्त झाले आहेत. शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर (Guard For Owner) देण्यात आला होता, त्यांनी  २६ महिने लष्करप्रमुख म्हणून पदभार संभाळला आहे. गेल्या महिन्यात सरकारने जनरल पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढवला गेला होता. सर्वसाधारणपणे लष्करात असे निर्णय घेतले जात नाहीत. जनरल मनोज पांडे (General Manoj Pandey) हे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. यांना अवघ्या सहा दिवसांपूर्वीच म्हणजे २५ मे रोजी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. या निर्णयामुळे लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना लष्कराच्या सर्वोच्च पदासाठी दुर्लक्षित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु सरकारच्या घोषणेने या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.

लष्करप्रमुख बनण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम केले होते. त्यांच्या नियुक्तीमध्ये सरकारने ज्येष्ठतेचे तत्त्व पाळले आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ अधिकारी दक्षिणेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (Ajay Kumar Singh) आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी आणि लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग हे दोघेही ३० जून रोजी निवृत्त होणार होते.

लेफ्टनंट जनरल द्विवेदींचे लष्करी तंत्रज्ञान वापरावर भर असणार आहेत.
तंत्रज्ञानाच्या वापरासाठी उत्साही असल्याने, लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी नॉर्दर्न कमांडमधील सर्व श्रेणींच्या तांत्रिक सीमा वाढवण्याचे काम केले. त्यांनी बिग डेटा ॲनालिटिक्स, एआय, क्वांटम आणि ब्लॉकचेन-आधारित सोल्यूशन्स यासारख्या महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रचार केला आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांच्या दोन परदेशी असाइनमेंट दरम्यान, ते सोमालिया मुख्यालयाचा UNOSOM II एक महत्वपूर्ण भाग होते. सेशेल्स सरकारचे लष्करी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (Defence Service Staff College), वेलिंग्टन आणि AWC, महू येथे हायकमांडच्या अभ्यासक्रमालाही हजेरी लावली आहे.

लेफ्टनंट जनरल द्विवेदीं यांना प्राप्त पुरस्कार:
USAWC, Carlisle, USA येथे त्यांना डिस्टिंग्विश्ड फेलो हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एमफिल पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय मिलिटरी सायन्समध्ये दोन पदव्युत्तर पदवी आहेत, त्यापैकी एक USAWC USA ची आहे.

हे ही वाचा :

T20 WORLD CUP : PANDYA आणि NATASAचा व्हिडीओ कॉलवर संवाद ; नात्यात सर्वकाही अलबेल

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version