नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स आज होणार जमीनदोस्त

नोएडामधील सुपरटेक ट्विन टॉवर्स, ज्याला भारतातील सर्वात उंच इमारत नोएडा ट्विन टॉवर्स देखील मानले जाते, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आज हे टॉवर्स जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स आज होणार जमीनदोस्त

नोएडामधील सुपरटेक ट्विन टॉवर्स, ज्याला भारतातील सर्वात उंच इमारत नोएडा ट्विन टॉवर्स देखील मानले जाते, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आज हे टॉवर्स जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. ९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात येणार आहेत. ‘एपेक्स’ ३२ मजली तर ‘सेयान’ हा टॉवर २९ मजल्यांचा आहे. हे महाकाय टॉवर्स पाडल्यानंतर तब्बल ३० मीटर उंचीपर्यंत ढिगारा तयार होण्याची शक्यता आहे. या ट्विन टॉवर्संना स्फोटकांच्या मदतीने दुपारी अडीचच्या सुमारास अवघ्या १३ सेकंदांमध्ये जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या कामासाठी नोएडा परिसरात ५६० पोलीस, १०० राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या (NDRF) टीम घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा :-  नोएडा ट्विन टॉवर्सची कथा’: सुपरटेक इमारती कशामुळे पाडल्या जाणार 

एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे ट्विन टॉवर (Twin Tower) पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटकं लावण्याचं काम करत आहे. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त होतील. विशेष म्हणजे, ३२ मजली टॉवर्स पाडल्यानंतर ३० मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरेल. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलं आहे. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत असेल. तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात येणार आहेत. ‘एपेक्स’ या इमारतीच्या खालच्या ११ मजल्यांवर आणि ‘सेयान’ इमारतीच्या मधल्या भागातील सात मजल्यांवर स्फोट घडवण्यात येणार आहे. अत्याधुनिक स्फोटकं आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे टॉवर्स पाडण्यात येणार आहेत. शॉक ट्यूब्स, इलेक्ट्रिक डिटोनेटर्स या पाडकामासाठी वापरण्यात येणार आहेत. १७७३ रोजी आयर्लंडच्या वॉटरफोर्डमधील ‘होली ट्रिनिटी कॅथेड्रॉल’ ही इमारत पाडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. त्यावेळी ६८ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. कोचीमधील चार इमारती पाडण्यासाठी २०२० रोजी भारतात या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. पूल, बोगदे, इमारती पाडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

नोएडातील सेक्टर ९३ A मधील ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पातील या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स आहेत. नोएड-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवेला लागून असलेल्या या टॉवर्सची उंची १०० मीटर लांब म्हणजेच कुतुबमिनारापेक्षाची जास्त आहे. या टॉवर्सचं पाडकाम हाती घेण्याआधी लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. टॉवर परिसराचा जवळपास ५०० मीटरचा भाग सील करण्यात आला आहे. या परिसरात पाडकामाशी निगडित अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तीनदा टॉवर्स पाडण्याची तारिख विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आज अखेर हा अनधिकृत टॉवर पाडण्यात येणार आहे.

हे ही वाचा :-

आरेसाठी आता राष्ट्रवादीही मैदानात

तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला ; पंतप्रधानांकडून कौतुक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version