spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gyanvapi Masjid Case : वाराणसी कोर्टाने मशिदीतील ‘शिवलिंग’च्या कार्बन डेटिंगला दिला नकार

उत्तर प्रदेशातील वाराणसी कोर्टाने आज शुक्रवारी ज्ञानवापी मशीद प्रकरणाशी संबंधित मोठा निर्णय दिला आहे. वाळुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात कार्बन डेटिंगची मागणी हिंदू पक्षाकडून कोर्टात करण्यात आली होती, त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

हेही वाचा : 

बाय बाय कार्टून नेटवर्क! ३० वर्षांच्या मनोरंजक प्रवासानंतर कार्टून नेटवर्क लवकरच होणार बंद

ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्वेक्षणादरम्यान वाजुखाना येथून सापडलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक चाचणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. या याचिकेवर वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी हिंदू पक्षाने आपले स्पष्टीकरण सादर करताना वाळूखानामध्ये सापडलेले शिवलिंग त्यांच्या दाव्याचा भाग असल्याचा दावा केला होता. त्यामुळे कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवलिंगासारख्या सापडलेल्या संरचनेचे वय, लांबी आणि रुंदी शोधण्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात यावे ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटींगची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. मशिदीमध्ये असलेले कारंजे हे शिवलिंगाचा आकारासारखे आहे. हे कारंजे नसून शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षातर्फे करण्यात आला होता. मशिदीच्या जागी आधी शिवमंदिर होते असे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी कथित शिवलिंगाची कार्बन डेटींग चाचणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. जेणेकरून कार्बन डेटिंगमुळे त्याचं वय किती आहे हे निश्चित होईल.

Andheri By Poll Election 2022 : दोन्ही पक्षच्या उमेदवांचे अर्ज दाखल, आमचाच विजय पक्का दोन्हीकडून आत्मविश्वास

मस्जिद समितीने म्हटलं होतं की, कथित शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी करण्याची गरज नाही. हिंदू पक्षाने आपल्या प्रकरणात ज्ञानवापीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देव-देवतांची पूजा करण्याची मागणी केली आहे. मग शिवलिंगाच्या तपासणीची मागणी का करत आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.

Bigg Boss Marathi 4 : जेवण बनवण्यावरून ‘या’ दोघींमध्ये उडाले खटके! पहा नेमकं झालं काय ?

Latest Posts

Don't Miss