spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सणासुदीच्या दिवसात सोने चांदीची धामधूम; दरवाढीचे सत्र सुरूच…

ऐन सणासुदीच्या दिवसात सोने चांदीने आपला भाव वरचढच ठेवला आहे. गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत सोन्यात १,००० रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव या काळात ८,६०० रुपयांनी वाढले आहेत.

ऐन सणासुदीच्या दिवसात सोने चांदीने आपला भाव वरचढच ठेवला आहे. गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत सोन्यात १,००० रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव या काळात ८,६०० रुपयांनी वाढले आहेत. या दोन्ही धातूंची जोरदार बॅटिंग सुरु आहे. देशातील अनेक सराफा पेठेत मौल्यवान धातू लवकरच कमाल करून दाखवण्याची शक्यता आहे. तर जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही धातूंनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

गेल्या आठवड्यात सोने ९०० रुपयांहून अधिकनी वाढले होते. आठवड्याच्या अखेरीसही मौल्यवान धातूची रस्सीखेच सुरूच होती. मात्र या आठवड्याची सुरुवात ही सोन्याच्या महागाईनेच झाली. या आठवड्याच्या सोमवारी सोन्याची ११० रुपयांनी वाढ झाली होती. तर आजही सकाळच्या सत्रात सोन्याने दरवाढीची चाहूल दिली आहे. माहितीनुसार आता २२ कॅरेट सोने ६८,८९५ रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५,१५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

सोन्याबरोबरच चांदीनेही गेल्या आठवड्यात ७ हजारांची उसळी घेतली आहे. चांदीच्या या तुफान घौडदौडने गुतंवणूकदार हवालदिल झाले आहेत. सोमवारी १६ सप्टेंबर रोजी चांदी १ हजार रुपयांनी वधारली तर आज १७ सप्टेंबर सकाळच्या सत्रात चांदीत १०० रुपयांची भर पडली आहे. माहितीनुसार एक किलो चांदीचा भाव ९३,१०० रुपये आहे.

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार २४ कॅरेट सोने ७३,४८९, २३ कॅरेट ७३,१९५, २२ कॅरेट सोने ६७,३१६ रुपयांवर घसरले. १८ कॅरेटचा भाव ५५,११७ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,९९१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८८,३१४ रुपये इतका झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत आहे.

Marathwada Mukti Sangram Day: मग बघा माझ्यासकट माझा आख्खा पक्ष तुमच्यासाठी उभा राहील, काय म्हणाले Raj Thackeray?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss