spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Today Gold Price भर लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

लग्नसराईचे (marriage ceremony) दिवस सुरू आहेत. गेल्या वर्षभरातील दरांमध्ये सोन्याने पुन्हा एकदा रेकॉर्ड (Gold Price) ब्रेक आहे. सोन्याचे दर ५४ हजारहून अधिक पोहोचले आहेत. लग्नासाठी सोनं खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांची सोनाराच्या मार्केटला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच दरम्यान सोन्याची मागणी वाढल्याने आता ग्राहकांच्या खिशावर ताण पडू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि आरबीआयकडून रेपो दरात वाढ करण्याची घोषणा झाल्यानंतर भारतीय बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी आली आहे. तर आता गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर १२०० रुपयांनी वाढले आहेत. दहा ग्राम शुद्ध सोन्याचा दर आता जीएसटीसह (GST) ५६ हजार रुपयांच्या पार गेला आहे.

हेही वाचा :  

लिओनेल मेसीचा मोठा निर्णय, फुटबॉल विश्वात एकच चर्चेला उधाण

याच दरम्यान मार्च २०२३ च्या डिलिव्हरीच्या चांदीच्या वायदा बाजारातील भावात ४२३ रुपये म्हणजेच ०.६२ टक्के वाढ झाली. या वाढीसह ६८०८५ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यावर एमसीएक्सवर सोन्याचा भाव ५४१३२ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता तर चांदीचा भाव ६७७८६ रुपये किलोग्रॅम इतका भाव होता.

ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी कायम

सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचं पाहायला मिळत आहे. या वाढत्या दरातही ग्राहक मोठ्या संख्येने ग्राहक सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे सध्या सुरु असलेली लगीनसराई आणि दुसरे म्हणजे सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याचा अंदाज असल्याने आजच सोनं खरेदी करणे. त्यामुळे सोन्याच्या पेढ्या ग्राहकांनी फुलल्याचं दिसत आहे.

दिल्लीत पुन्हा अत्याचाराला बळी पडली तरुणी, अ‍ॅसिडने हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासनाला आली जाग

मुंबई (२४ कॅरेट सोन्याचा भाव)१ ग्रॅम सोन्याचा भाव – ५४३३ रुपये, १० ग्रॅम सोन्याचा भाव – ५४३३० रुपये, (२२कॅरेट सोन्याचा भाव) १ ग्रॅम सोन्याचा भाव – ४९८० रुपये १० ग्रॅम सोन्याचा भाव – ४९८०० रुपये

पुणे (२४ कॅरेट सोन्याचा भाव), १ ग्रॅम सोन्याचा भाव – ५४३३ रुपये, १० ग्रॅम सोन्याचा भाव – ५४३३० रुपये, (२२कॅरेट सोन्याचा भाव) १ ग्रॅम सोन्याचा भाव – ४९८० रुपये १० ग्रॅम सोन्याचा भाव – ४९८०० रुपये

अर्जुन तेंडुलकरची रणजित धमाकेदार एन्ट्री, रणजी पदार्पणातच ठोकले शतक

Latest Posts

Don't Miss