Gold Rate : सोन्याला पुन्हा एकदा झळाळी, चोवीस तासातदरात १५०० रुपयांची वाढ

Gold Rate : सोन्याला पुन्हा एकदा झळाळी, चोवीस तासातदरात १५०० रुपयांची वाढ

जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात जळगाव चे सुवर्ण नगरीत पंधराशे रुपयांची वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. मागील काळात ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी मोठी संधी निर्माण झाली होती. त्यावेळी शुद्ध सोन्याचे दर ५१ हजार रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर दोनशे-पाचशे रुपये कमी-अधिक होत हे भाव गेल्या महिनाभरापासून याच रेंजमध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र गेल्या दोन दिवसाच्या काळात ५१ हजार ५०० रुपयांवरुन हे भाव ५२ हजार ८०० रुपयांवर जाऊन पोहोचले असल्याचं आज (१४ नोव्हेंबर २०२२) पाहायला मिळालं आहे.

हेही वाचा : 

Jitendra Awhad : तक्रारदार महिलेचा ‘बहीण’ म्हणून उल्लेख, जयंत पाटील यांनी जुना दाखवला व्हिडीओ

दुसरीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी लग्न कार्यामुळे सोने खरेदी करायची होती आणि त्यात दरात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने वाढत्या दरातही आम्ही सोने खरेदी करत आहोत. मात्र यामुळे बजेट बिघडले असल्याने जेवढे घ्यायचे होते त्यापेक्षा कमी दागिने आता घेणार असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांची आहे.

वरिष्ठ बाजार विश्लेषक म्हणाले की, जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चिततेच्या दरम्यान, या वर्षीच्या सोन्याच्या मागणीने हे स्पष्ट केले आहे की सोन्याला अजूनही सुरक्षित गुंतवणूक माध्यमाचा दर्जा आहे. २०२२ मध्ये सोन्याची कामगिरी गुंतवणुकीच्या इतर मार्गांपेक्षा चांगली होती हे वाढलेल्या मागणीवरून सिद्ध होते. येत्या काळात आम्ही मध्यवर्ती बँकांकडून खरेदी आणि किरकोळ गुंतवणूक मजबूत राहण्याची अपेक्षा करतो. डॉलर मजबूत राहिल्यास ओटीसी आणि ईटीएफ गुंतवणूक कमी राहील. भारत आणि आग्नेय आशिया सारख्या काही प्रदेशांमध्ये दागिन्यांची मागणी मजबूत राहण्याचीही आम्हाला अपेक्षा आहे.

‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

Exit mobile version