सोन्याच्या दरात घसरण, पहा आजचा दर

मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होती. पण आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सोन्याच्या दरात घसरण, पहा आजचा दर

मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होती. पण आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. न्यूयॉर्क ते नवी दिल्लीपर्यंत सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत ५०० रुपयांपेक्षा जास्त घसरण दिसून आली आहे. तर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात प्रति औंस १२ डॉलरची घसरण झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

आज भारतामध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दुपारी १ वाजून १३ मिनीटांनी सोन्याचा भाव ४३८ रुपयांच्या घसरणीसह ५८ हजार ९७० रुपयांवर व्यवहार करत आहेत. व्यवहारादरम्यान सोन्याचा भाव ५८हजार ८८० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला आहे. मात्र, आज सोन्याचा भाव ५९ हजार २०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला. शुक्रवारी सोन्याचा भाव ५९ हा ४०८ रुपयांवर बंद झाला होता. तसेच चांदीच्या दरातही काही प्रमाणात घसरण झाली आहे. चांदीचे दर ५०० रुपयांपेक्षा जास्त घसरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर दुपारी १ वाजून १७ मिनीटांनी चांदीचा भाव ४१२ रुपयांनी घसरुन ७० हजार ८७५ रुपयांवर आला आहे. व्यवहारादरम्यान चांदी ५०७ रुपयांनी स्वस्त होऊन ७० हजार ७८० रुपयांवर पोहोचली. मात्र, आज चांदी ७१ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर उघडली. शुक्रवारी चांदी ७१ हजार २८७ रुपये प्रति किलोवर बंद झाली आहे.

सोन्याच्या दरात ५०० रुपयाने घसरण झाली आहे. पण येत्या काही काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका, इजिप्त आणि इस्रायलने दक्षिण गाझामध्ये युद्धबंदी जाहीर केली आहे.

हे ही वाचा: 

शिवानी रांगोळेने मराठमोळ्या अंदाजात शेअर केला जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील फोटो

मुंबई, पुणे पाठोपाठ सोलापुरातही ड्रग्सचा धंदा, मुंबई गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version