spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gold Silver Rate 12 September: सोने चांदीच्या किंमतीत झटपट चढउतार, सणासुदीच्या दिवसात दर काय ?

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. अशातच सोने आणि चांदीच्या किंमतींनी उंची गाठली आहे. ऑगस्टच्या सुरूवातीला दोन्ही धातूच्या किंमती वाढल्या होत्या पण नंतर त्यात घट झालेली दिसून आली. गेल्या दोन आठवड्यात सोन्या चांदीच्या किंमती उतरल्या होत्या. या आठवड्यात पुन्हा या किमतींमध्ये वाढ झालेली दिसत आहे.

सोन्याने गाठला मोठा टप्पा
गेल्या आठवड्यातील मरगळ झटकून सोन्याने आता पुन्हा चढता क्रम गाठला आहे. मंगळवार १० सप्टेंबर रोजी सोने ४४० रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर बुधवारी सोने ३८० रुपयांनी वाढले. तर आज १२ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आता २२ कॅरेट सोने ६७,३१० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,४१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

चांदीही उसळली
गेल्या काही आठवड्यांमध्ये चांदीच्या किंमती कमी होऊन या आठवड्यात चांदीने किंमतीत चांगलाच टप्पा गाठला आहे. ९ सप्टेंबरला चांदी ५०० रुपयांनी वाढली. त्यात १० सप्टेंबरला १ हजारांची वाढ झाली. ११ सप्टेंबर रोजी ५०० रुपयांनी किंमत वाढली. तर १२ सप्टेंबर सकाळी १०० रुपयांची वाढ झाली. आता एक किलो चांदीचा भाव ८६,६०० रुपये इतका आहे.

१४ ते २४ कॅरेट भाव
आजच्या इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सत्रानुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१,९९५ तर २३ कॅरेट ७१,७०६ रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोने ६५,९४७ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५३,९९६ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,११७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८३,४०७ रुपये इतका आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क आकारले जात नाही. तर सराफ बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत पाहायला मिळते.

Latest Posts

Don't Miss