spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gold Silver Rate Today : पितृपक्षातील या’ तिथीला सोने आणि चांदी खरेदी करणे मानले जाते शुभ त्याबद्दल माहिती आहे का तुम्हांला?

Gold Silver Rate Today : सोने आणि चांदी हे दोन्ही धातु किमतींचा उच्चांक गाठत होते परंतु आता पितृपक्षाची सुरुवात होताच सोने आणि चांदीच्या धातूंचे भाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत. परंतु या आठवड्यात या किमतींमध्ये बराच फरक पाहायला मिळत आहे. फक्त सोमवारचा एक दिवस सोडला तर आता या दोन दिवसांत सोने चांदीच्या भावांमध्ये घसरण झालेली पाहायला मिळतेय. पितृपक्षाच्या या काळात अनेक गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. या दिवसांत आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. अनेक महत्वाची कामे करणे टाळली जातात. पण पितृपक्षातील या तिथीला सोने चांदी खरेदी करणे हे शुभ मानले जाते.

सोने चांदी खरेदीचा शुभ मुहूर्त कोणता ?
पितृपक्षातील काळ सोने चांदी खरेदी करण्याकरिता वर्ज्य मानला जातो. या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचे दिवस असतात. त्यामुळे मोठे काही खरेदी करणे वर्ज्य मानतात. मात्र शाश्त्रात असे काही स्पष्ट सांगितलेले नाही, पण पूर्वपार चालत आलेल्या या गोष्टी आजही पाळल्या जातात. परंतु पितृपक्षातील अष्टमी तिथीला सोने व चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, शाश्त्रात यासंबंधित नेमका काय नियम सांगितला आहे याची माहिती करून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.

१४ ते २४ कॅरेटचा भाव
आज सकाळच्या इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७३,२५७ रुपये , २३ कॅरेट ७२,९६४ रुपये , २२ कॅरेट सोने ६७,१०३ रुपये , १८ कॅरेट ५४,९४३ रुपये , १४ कॅरेट ४२,८५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८७,४०६ रुपये इतका झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीवर कुठलेही कर किंवा शुल्क आकारले जाते नाही. परंतु सराफा बाजारात कर आणि शुल्काचा समावेश होत असल्याने किंमतीत फरक दिसून येतो.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss