ट्विटर युजर्ससाठी आनंदाची बातमी; एलॉन मस्क यांची नवीन योजना

ट्विटर युजर्ससाठी आनंदाची बातमी; एलॉन मस्क यांची नवीन योजना

एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत .एलॉन मस्क यांनी ट्विटर यूजर्सच्या सोईप्रमाणे त्यांना सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे. मस्क यांनी ट्विटरची मालकी घेण्याआधी ट्विटरने युजर्सना काही निर्बंध लावले होते. एलॉन मस्क यांनी मालकी घेताच पहिले यूजर्सवरचे निर्बंध हटवले आता ट्विटरवर युजर्स त्यांचे विचार ट्विटरवर मांडू शकतात. मस्क यांनी युजर्सना ट्विट करण्याचे पूर्ण स्वतंत्र्य दिले आहे. एलॉन मस्क हे आता ट्विटरमध्ये क्रिएटर मॉनिटाईझेशन आणणार आहेत. म्हणजेच ट्विटर युजर्स फेसबुक आणि युट्युबप्रमाणे ट्विटरवर सुद्धा पैसे कमवू शकणार आहेत .

फेसबुक आणि युट्युब त्यांच्या यूजर्सना मिळालेल्या लाईक्सवर आणि त्यांनी केलेल्या पोस्टच्या प्रसिद्धीनुसार पैसे देण्यासाठी क्रिएटर मॉनिटाईझेशनचा वापर करतात. आता त्याच प्रमाणे ट्विटर लवकरच यूजर्सना त्यांच्या ट्विट्समध्ये मोठा मजकूर जोडण्याची परवानगी देणार असल्याची घोषणा ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी केली आहे व क्रिएटर मॉनिटाईझेशन आणण्याची घोषणा देखील मस्क यांनी केली आहे. यामध्ये सगळ्या प्रकारच्या टट्विट्सचा समावेश असणार आहे , असेही एलॉन मस्क यांनी सांगितले आहे . यूजर्सनी केलेलय ट्विटला मिळणाऱ्या लाईक्स व प्रसिद्धीनुसार ट्विटर यूजर्सना पैसे देईल .

एका कन्टेन्ट क्रिएटरने एलॉन मस्क यांना विचारले की “YouTube हे जाहिरातीतून मिळणाऱ्या कमाईचा ५५%,भाग निर्मात्यांना देते . यावर एलॉन मस्क यांनी सांगितले की, ट्विटर त्याच्यावरही मात करेल. म्हणजेच ट्विटर सुद्धा जाहिरातीतून मिळणाऱ्या नफ्यातून निर्मात्यांना एक भाग देईल ज्यामधून त्यांना अधिक कमाई करता येईल. जगातील सर्व प्रसिद्ध कलाकार ,राजकीय व्यक्तिमत्व ,उद्योगपती , व सर्वसामान्य लोक ट्विटरवरचा वापर करतात व रोज काहीना काही ट्विट करत आपले विचार जगासमोर मांडतात .जगभरत घडणाऱ्या घडामोडी कधीकधी ट्विटरवर सर्वात आधी कळतात .

हे ही वाचा :

पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणूका लागणार; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

Bharat Jodo Yatra : आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील आमदार-खासदार भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

EWS Reservation : आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा, १० टक्के आरक्षण वैधच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version