Sunday, June 30, 2024

Latest Posts

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना..  

खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर ! महिलांना मिळणार प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये

विधासभा निवडणुकीसाठी मतदार राजाला आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती (Mahayuti) सरकारने नवनवीन योजना लोकांसमोर आणल्या आहेत. यातीलच एक म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही  योजना. लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election) पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील (Vidhansabha Election) विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

या योजनेची पार्श्वभूमी पाहता आपल्या असे लक्षात येईल की, गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ ही योजना आणली. त्या निवडणुकीचे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने राज्यात पुन्हा बहुमत मिळविले अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मध्य प्रदेशने २९ पैकी २९ जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. या दोन्ही विजयांमागे ‘लाडली बहना योजना’ कळीची ठरल्याचे मानले जाते. आता हेच प्रारूप राज्यात राबविण्याची तयारी शिंदे सरकारने केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे. विशेषतः महिला आणि तरुणांच्या मतपेढीवर डोळा ठेवून त्यांना खूश करण्यासाठी यांसारख्या अनेक योजना राज्यात राज्यसरकार स्थापन करत आहेत.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, त्यांच्या अवलंबित मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्तरामध्ये सतत सुधारणा व्हावी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक बळकट व्हावी यासाठी, माननीय मुख्यमंत्री, मध्य प्रदेश सरकार, २८ जानेवारी २०२३, संपूर्ण मध्य प्रदेशात ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजना’ लागू करण्याची घोषणा केली ज्या अंतर्गत महिलांना प्रति महिना १००० रुपये दिले जातील. महिलांचे आरोग्य आणि पोषण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल या दृष्टीने ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे. 

‘मुख्यमंत्री लाडकी बहिणी’ ही योजना नक्की आहे तरी काय ?

राज्यात मतदार वर्गाला खुश करण्यासाठी मोठ्या योजनांची आखणी सुरू आहे. राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबविण्याचे नियोजन आहे. या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांचे एक नवे पथक अलीकडेच मध्य प्रदेशला पाठविले होते. आता जाणूयात की ही  योजना नक्की असते तरी काय ?

  • महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी योजना.
  • पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील ९० ते ९५ लाख महिलांना महिन्याला १२०० ते १५०० रुपये.
  • दारिद्रयरेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, तसेच विधवा, परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ.
  • रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा.

या पथकाने योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्याआधारे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे समजते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon session) याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे ही योजना कार्यरत होईल.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss