गुगल डूडलने संगीतकार भूपेन हजारिका यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त केला सन्मान

गुगल डूडलने संगीतकार भूपेन हजारिका यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त केला सन्मान

गुगलने आज प्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माते डॉ. भूपेन हजारिका यांचा ९६वी जयंती साजरी केली आहे. गुगलने एका खास डूडलद्वारे त्याचा सन्मान केला आहे. हजारिका यांचा जन्म १९२६ साली आसाममध्ये झाला. गुगलने म्हटले आहे की, “हॅपी बर्थडे भूपेन हजारिका! तुमची गाणी आणि चित्रपट आसामच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव करतात. मुंबईस्थित कलाकार रुतुजा माळी यांनी रंगवलेली ही कलाकृती आसामी सिनेमा आणि लोकसंगीत लोकप्रिय करण्यासाठी हजारिका यांच्या कार्याचा गौरव करते.” असे म्हणत त्यांचा सन्मान केला.

हेही वाचा : 

आयफोन १४ जुन्या आयफोन १३ पेक्षा कसा वेगळा आहे, जाणून घ्या दोन्ही फोनची वैशिष्ट्ये व फरक

हजारिका हे केवळ बालसंगीताचे प्रतिभावंत नव्हते तर ते एक बुद्धिजीवीही होते. त्यांनी १९४६ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पीएचडी मिळवली. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आसामी संस्कृतीला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय करणाऱ्या गाण्यांवर आणि चित्रपटांवर काम सुरू ठेवण्यासाठी ते भारतात परतले.

वादग्रस्त मोपलवारांचा आठव्यांदा कार्यकाळ वाढवून मिळवण्याचा प्रयत्न, दोन पदांसाठी धडपड

सहा दशकांच्या कारकिर्दीत, हजारिका यांनी संगीत आणि संस्कृतीतील अतुलनीय योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारखी अनेक प्रतिष्ठित पारितोषिके जिंकली. २०१९ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळासह अनेक मंडळे आणि संघटनांचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम केले.

अहमदनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण, शिर्डीत अचानक कलम १४४ लागू

Exit mobile version