गूगलचे अनोखे डूडल, आता डूडल दाखवतंय बबल टी बनवण्याची रेसिपी

गूगलचे अनोखे डूडल, आता डूडल दाखवतंय बबल टी बनवण्याची रेसिपी

आतापर्यंत आपण अनेकदा पहिले असेल की गूगल डूडल (google doodle) नेमकं आहे कायं? गूगल डूडल नेहमीच नवीन गोष्टींचे सादरीकरण करत असते. टँगी, फ्रुटी, स्विट आणि मिल्की अशा फ्लेवर्सचा ‘बबल टी’ (Bubble Tea) प्यायला अनेकांना आवडतो.बबल टी हे तैवानी पेय आहे. याला बोबा टी (Boba Tea) आणि पर्ल मिल्क टी (Pearl Milk Tea) या नावानं देखील ओळखले जाते. फ्रुट जेली किंवा टॅपिओकाने ‘बबल टी’मधील बबल बॉल तयार केले जातात. बबल टीची लोकप्रियता जागतिक स्तरावर इतकी वाढली आहे की त्यामुळे ‘बबल टी’ ला अधिकृतपणे ‘न्यू इमोजी’ म्हणून गूगल कडून घोषित करण्यात आले आहे.

गूगल हे डूडलच्या माध्यमातून अनेक वेळा काही ना काही उपक्रम राबवताना आढळले आहे. अलीकडेच गूगल डूडलने ३१ डिसेंबरसाठी देखील अनेक वेळा अनोखे सादरीकरण केले होते तर आता गुगल डूडलने बबल टी हे तैवान मधील प्रसिद्ध पेय सध्या ज्याची लोकप्रियता संपूर्ण जगभरात आहे. या जगप्रसिद्ध पेयांची रेसिपी सध्या गूगल डूडल हे दाखवत आहे. जर तुम्हाला हे पाहायचे असेल तर तुम्हाला यासाठी तुम्हाला गूगल डूडलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एक व्हिडीओ दिसेल. त्या व्हिडीओमध्ये फॉर्मोशन माउंटन डॉग आणि त्याचे टी शॉप तुम्हाला दिसेल. त्यानंतर फॉर्मोशन माउंटन डॉगच्या टी शॉपमध्ये येणाऱ्यांसाठी तुम्हाला बबल टी तयार करायची आहे. हे टी शॉप बंद होण्यापूर्वी तुम्हाला पाच ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी स्क्रिनवर येणाऱ्या साहित्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल, त्यानंतर तुमचा बबल टी तयार होईल.

गूगल डूडलचाकढून बबल टी ला तयार करण्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये बबल टीचं डूडल कसं तयार झालं? हे दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही गूगल डूडलचं डिझाइन देखील पाहू शकता.

हे ही वाचा:

PM Modi Mumbai Visit, पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, पोलीस बंदोबस्त तैनात

अदानी समूहाने दिले हिंडेनबर्गच्या अहवालाला प्रत्युत्तर, अहवाल खोटा असल्याचा केला दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version