spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सरकारची योजना बदलली, Ration Card वर मिळणारे मोफत तांदूळ बंद, मिळणार ‘या’ अत्यावश्यक वस्तू

केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना (Schemes) राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. यामध्ये रेशन कार्डधारकांना (Ration Card) मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते. मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला असून, त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ (Rice) बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश असणार आहे.

केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० % कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये नागरिकांना याआधी मोफत तांदूळ दिले जात होते. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त आता गहू (Wheat), डाळी, हरभरा, साखर (Sugar), मीठ (Salt), मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन (Soyabean) आणि मसाले (Spices) या वस्तू मिळणार आहेत. नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारेल, अशी सरकारला आशा आहे.

मोदी सरकारने तिस-यांदा सत्तेत येण्याअगोदर पुढील ५ वर्षे मोफत धान्य पुरविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता देशातील जनतेला पुढील पाच वर्षे मोफत धान्य मिळेल, असा विश्वास होता. परंतु केंद्र सरकारने या योजनेत बदल करून आता मोफत मिळणारा तांदूळ (Rice) बंद केला आहे. याऐवजी आहारातील पोषणाची पातळी लक्षात घेऊन इतर ९ वस्तूंचा समावेश केला आहे. त्यामुळे यापुढे आता तांदळाऐवजी अन्य वस्तू मिळतील, असे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss