spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gold Hallmarks बनावट हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या विक्रीवर सरकार घालणार आळा, काय असेल योजना

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदील (Gold Hallmarks) उधाण आलं आहे. सराफ बाजारात मोठी गर्दी असते. यावेळी आपण होलमार्किंग पाहून दागिने घेतो. सध्या होलमार्किंगमध्येही फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचं समोर आलं आहे. बनावट होलमार्किंग करून दागिने विकले जात आहेत. त्यामुळे दागिने घेताना तुम्हाला अनेकदा विचार करावा लागतो. पण आता चिंता करू नका. बनावट हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या विक्रीवर सरकार आता आळा (Fake Hallmarking) घालणार आहे. यासंदर्भात सरकार काही योजना आखात आहेत.

हेही वाचा : 

थर्टी फर्स्टच्या पार्शवभूमीवर पुणे पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये, केल्या दोन मोठी कारवाई

सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्याने देशात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होते. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत हे सोने बनावट हॉलमार्क असलेल्या दागिन्यांमध्ये वापरले जाते. किरकोळ दुकानदारांसाठीही ते स्वस्त आहे. दुसरीकडे, एमपी अहमद म्हणतात की भारतीय मानक ब्युरोने जून २०२१ पासूनच देशात दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. पण बनावट हॉलमार्क असलेले दागिने हे अशुद्ध किंवा तस्करीच्या सोन्यापासून बेकायदेशीरपणे बनवले जातात. यामुळे ज्वेलर्सचे नुकसान होते जे योग्य आणि कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करतात.

भारतीय कफ सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू? गॅम्बियानंतर आता उझबेकिस्तानने केले आरोप

सरकार बनावट हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या बाजारावर लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर अनेक दुकानदार, हॉलमार्क फेडरेशन आणि इतर बाजार संघटनांनीही याबाबत शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. आता यावर बंदी घालण्यासाठी नियम आणण्यास सरकारकडून विलंब होत आहे.बनावट हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने आणि त्यात वापरलेले तस्करीचे सोने यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्याच वेळी, बीआयएसने बनावट हॉलमार्किंग रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. BIS चे हॉलमार्किंग जेथे कोणत्याही दागिन्यातील सोन्याची शुद्धता ठरवली जाते. त्याचबरोबर हा निर्णय घेण्यासाठी ज्वेलर्सकडे हॉलमार्किंग परवाना असणे बंधनकारक आहे.

हिमवादळानंतर niagara falls पूर्णपणे गोठला, अमेरिकेला तडाखा

Latest Posts

Don't Miss