Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Chatrapati Shahu Maharaj Jayanti: देशाला लाभलेल्या लोकशाहीवादी राजेंना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे आणि आपल्या कार्याचा व विचारांचा ठसा उमटवणारे लोकराजे 'छत्रपती शाहू महाराज' यांची आज (दि.२६ जून २०२४) रोजी जयंती आहे. अशा या राजाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे आणि आपल्या कार्याचा व विचारांचा ठसा उमटवणारे लोकराजे ‘छत्रपती शाहू महाराज’ यांची आज (दि.२६ जून २०२४) रोजी जयंती आहे. अशा या राजाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

‘छत्रपती शाहू महाराज’ यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. शाहू महाराजांचे मूळ नाव हे ‘यशवंतराव’ होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू आणि चौथे शाहू अशा विविध नावांनी  ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षाचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थांनचे छत्रपती शाहू महाराज झाले.

‘छत्रपती शाहू महाराज’ हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात- पंथांची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे प्राधान्य होते. रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज आजही जनतेच्या मनावर राज्य करत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच शाहू महाराजांचा संपूर्ण देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो. रजत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.

छत्रपती शाहू महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू महाराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफतशिक्षणाचा कायदा केला. तसेच त्यांनी ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. ‘एक वेळ गाडी सोडू देईन, पण बहुजनोद्धाराचे कार्य सोडणार नाही’ असे म्हणणाऱ्या दुर्मिळ राजाला १५० व्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.

हे ही वाचा

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहा; ‘अशी’ घ्या मुलांची काळजी

पहिल्यांदाच होणार लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक … ओम बिर्ला विरुद्ध के सुरेश..कुणाचा विजय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss