GST Day : १ जुलै रोजीच का साजरा करतात ‘हा’ दिवस ?

जीएसटी दराची गणना करण्यासाठी, भारत सरकारने एक जीएसटी कॅल्क्युलेटर जारी केला आहे ज्याद्वारे आपण आपल्या प्रत्येक वस्तूचा जीएसटी दर जाणून घेऊ शकतो.

GST Day : १ जुलै रोजीच का साजरा करतात ‘हा’ दिवस ?

आपण अनेक दिवस (Days) साजरे करतो. त्यापैकीच एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे GST दिवस होय. आज आपण त्याबद्दलचीच काही महत्वपूर्ण माहित यात देणार आहोत. वस्तू आणि सेवा कर (GST) ही भारतामध्ये १ जुलै २०१७ पासून लागू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अप्रत्यक्ष प्रणाली आहे. ज्याचे स्वातंत्र्यानंतरचे सरकार आणि अनेक अर्थतज्ज्ञांनी विशेष कौतुक केले आहे. त्याच करप्रणालीच्या अंमलबजावणीसह, केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांद्वारे विविध दरांवर लादलेले विविध कर काढून संपूर्ण देशासाठी एकच अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. ही कर प्रणाली लागू करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत सुधारणा करण्यात आल्या होत्या.

वस्तू आणि सेवा कर हे वस्तू आणि सेवा कर परिषदेद्वारे प्रशासित केले जाते. भारताचे अर्थमंत्री हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. GST अंतर्गत, वस्तू आणि सेवांवर खालील दरांद्वारे कर आकारला जातो, या कराचे एकूण पाच प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे – 0%, 5%, 12%, 18% आणि 28% . उग्र मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान दगडांवर ०.२५ % इतका कर लावला जातो. तसेच सोन्यावर 3% हा विशेष दर लावला जातो. याच GST चे एकूण चार प्रकार पडतात. ते म्हणजे-

जीएसटी दराची गणना करण्यासाठी, भारत सरकारने एक जीएसटी कॅल्क्युलेटर जारी केला आहे ज्याद्वारे आपण आपल्या प्रत्येक वस्तूचा जीएसटी दर जाणून घेऊ शकतो. वस्तू आणि सेवा कर (GST) ही भारतातील एक अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे जी वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लागू होते. दरवर्षी १ जुलै रोजी, केंद्र सरकारद्वारे या महत्त्वपूर्ण कर सुधारणांच्या अंमलबजावणीचा उत्सव साजरा करण्यासाठी GST दिवस साजरा केला जातो .

भारतात जीएसटी दिवस काय आहे?
GST ही भारतातील एक अप्रत्यक्ष आणि सर्वसमावेशक करप्रणाली आहे. भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर (पेट्रोलियम, अल्कोहोलिक पेये आणि मुद्रांक शुल्क अपवाद वगळता) हा आकारला जातो. यात अनेक देशांतर्गत अप्रत्यक्ष कर जसे की व्हॅट सेवा कर आणि उत्पादन शुल्क समाविष्ट केले गेले आहे. त्याची अंमलबजावणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून मानली जाते आणि या महत्त्वाच्या टप्प्याचे स्मरण करण्यासाठी GST दिवस साजरा केला जातो.

जीएसटी दिवसाची तारीख आणि महत्त्व :

भारतात GST लागू झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्त GST दिवस साजरा केला जातो. १ जुलै २०१७ रोजी GST लागू करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी १ जुलै रोजी GST दिवस साजरा केला जातो.

GST दिवस कोणी सुरू केला?
२०१७ मध्ये जीएसटीच्या पहिल्या वर्षी यशस्वी अंमलबजावणीने भारतीय करदात्यांनी या अभूतपूर्व कर सुधारणेमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची इच्छा दर्शविली. परिणामी केंद्र सरकारने १ जुलै हा दिवस GST दिवस म्हणून नियुक्त करण्यात आला.

पहिला GST दिवस कधी साजरा करण्यात आला?
१ जुलै २०१८ रोजी जीएसटी दिन सोहळ्याचे उद्घाटन झाले, ज्याने कर प्रणाली लागू झाल्यापासून एक वर्षाचा टप्पा आपण सर्वानी गाठला.

जीएसटी कायद्याच्या परिचयाबद्दल रोचक तथ्ये

हे ही वाचा :

T20 WORLD CUP : PANDYA आणि NATASAचा व्हिडीओ कॉलवर संवाद ; नात्यात सर्वकाही अलबेल

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version