spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विना – पॅकिंग आणि विना – लेबल विकल्या जाणाऱ्या पदार्थांवर आकाराला जाणार नाही जीएसटी, निर्मला सीतारमण यांचे स्पष्टीकरण

विना पॅकिंग किंवा विना लेबल विक्री होत असलेल्या दाळ, पीठ, तांदूळ, ओट्स, रवा किंवा दही, लस्सी अशा पदार्थांवर जीएसटी लावण्यात येणार नाही आहे. या गोष्टीबाबत सविस्तर माहिती देताना निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ज्या खाद्यपदार्थांवर जिसटी आकाराला जाणार नाही,

हल्लीच काही जीवनावश्यक वस्तूंवर ५% जीएसटी आकारल्यामुळे अनेक वस्तूंचे, पदार्थांचे भाव काही प्रमाणात वाढत चालले होते. तर, याच जीएसटीबाबत आता अजून एक गोष्ट समोर येत आहे आणि ती म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितनुसार विना पॅकिंग किंवा विना लेबल विक्री होत असलेल्या दाळ, पीठ, तांदूळ, ओट्स, रवा किंवा दही, लस्सी अशा पदार्थांवर जीएसटी लावण्यात येणार नाही आहे. या गोष्टीबाबत सविस्तर माहिती देताना निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ज्या खाद्यपदार्थांवर जिसटी आकाराला जाणार नाही, त्यांची यादी जाहीर केली आहे. जर हेच पदार्थ ब्रॅन्डेड किंवा पॅकड् असतील तर त्यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
लेबल असलेल्या किंवा पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे की, खाद्य पदार्थांच्या लूज विक्रीवर म्हणजे विना पॅकिंग आणि विना लेबल पदार्थआंच्या विक्रीवर कोणताही जीएसटी लावण्यात येणार नाही. पण हेच पदार्थ जर लेबल लावून विक्री होत असतील तर त्यावर पाच टक्क्यांचा जीएसटी लावण्यात येईल. या पदार्थांवर जीएसटी न लावण्याचा निर्णय हा कोणत्या एका व्यक्तीचा नसून तो जीएसटी काऊन्सिलचा आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. लेबल असलेल्या किंवा पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे की, खाद्य पदार्थांच्या लूज विक्रीवर म्हणजे विना पॅकिंग आणि विना लेबल पदार्थआंच्या विक्रीवर कोणताही जीएसटी लावण्यात येणार नाही. पण हेच पदार्थ जर लेबल लावून विक्री होत असतील तर त्यावर पाच टक्क्यांचा जीएसटी लावण्यात येईल. या पदार्थांवर जीएसटी न लावण्याचा निर्णय हा कोणत्या एका व्यक्तीचा नसून तो जीएसटी काऊन्सिलचा आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

Latest Posts

Don't Miss