spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CBSE बोर्डाकडून दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात गाईडलाईन्स जारी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) शैक्षणिक सत्र २०२२ -२३ साठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

CBSE Board Exam 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) शैक्षणिक सत्र २०२२ -२३ साठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाने ०२ जानेवारी ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान इयत्ता दहावी (CBSE 10th Exams) आणि बारावीसाठी (CBSE 12th Exams) प्रॅक्टिकल परीक्षा (Practical Exams) घेणार आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर पूर्ण करण्याचं आवाहन बोर्डानं शाळांना केलं आहे. बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SoP) आणि मार्गदर्शक तत्त्वं देखील जारी केली आहेत.

दरम्यान, सध्या देशासह जगात कोरोना प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भावात झालेली घट लक्षात घेता, CBSE ने १५ फेब्रुवारी २०२३ पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. तसेच सीबीएसईने अद्याप १० वी आणि १२ वीच्या सिद्धांत परीक्षेची तारीखपत्रके जारी केलेली नाहीत.

०२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीतील विद्यार्थ्यांचे गुण/इंटरनल ग्रेड अपलोड करण्याचे निर्देश बोर्डानं शाळांना दिले आहेत. विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षा/प्रोजेक्ट असेसमेंट/अंतर्गत मुल्यांकनामध्ये बसू शकतात. जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, ‘सर्व विद्यार्थ्यांना सूचना द्या की, त्यांना दिलेल्या वेळापत्रकातच प्रॅक्टिकल परीक्षा द्यावा लागतील. परीक्षेच्या दिवशी कोणत्याही कारणानं गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा निश्चित तारखांमध्ये पुन्हा घेतली जाईल. प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याचं नोंदवण्यात यावं आणि एखाद्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा इतर कोणत्याही तारखेला घेतली जाणार असेल तर त्याची ‘अनुपस्थित’ ऐवजी ‘रीशेड्यूल’ अशी नोंद केली जावी, असंही बोर्डानं म्हटलं आहे. शाळेला निश्चित वेळापत्रकातच रीशेड्यूल म्हणून चिन्हांकित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची परवानगी दिली जाईल.

CBSE १० वी आणि १२ वी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक २०२३ : कसे तपासावे

  • CBSE बोर्डाचे प्रात्यक्षिक वेळापत्रक तपासण्यासाठी, सर्वप्रथम cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
  • वेबसाइटच्या होम पेजवर मुख्य वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर दहावी/बारावी, २०२२-२३ साठी प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी/अंतर्गत मूल्यमापन/प्रकल्प या लिंकवर जा.
  • आता वेळापत्रक pdf स्वरूपात उघडेल.
  • ते तपासल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टर्मच्या परीक्षेचं आयोजन गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करण्यात आलं होतं. तर टर्म-२ ची परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू झाली होती. यावर्षी सीबीएसईनं २२ जुलै रोजी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. इयत्ता बारावी मध्ये एकूण ९२.७१ टक्के तर दहावी मध्ये ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Winter Session 2022 अधिवेशनाचा आज ८ वा दिवस, विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज होणार सुटका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss