spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujarat Election 2022 Results निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इंटरनेटवर मिम्सचा पाऊस

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे कल स्पष्ट झालेले आहेत. भाजप ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. गुजरातमध्ये आजवर भाजपला (Gujarat Election 2022 Results) एवढं यश कधीही मिळालं नव्हतं. भाजप १५५ जागांच्या पुढे सरकला आहे. तर काँग्रेस १६ ,आप ५ जागांवर आघाडीवर आहे. तर हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजप मध्ये चांगलाच अटीतटीचा सामना रंगलेला दिसतोय. जेव्हा जेव्हा निवडणूक, निवडणुकीचा निकाल असतो भारतात एक वेगळाच माहोल असतो. निवडणुकीचा माहोल! देशात कुठेही निवडणूक असो, जाळ आणि धूर सगळीकडेच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असेल. सध्या इंटरनेटवर लोक धुराळा करतात. नुसते मिम्स वर मिम्स! जसजसा निवडणुकीच्या निकालात रंग चढत जातो तसतसा इंटरनेटवर मिम्सचा रंग चढत जातो. विविध चित्रपटातील मजेशीर किस्से दाखवत त्याला निवडणुकांचे स्वरूप दिले आहे.

नेटकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Latest Posts

Don't Miss