Gujarat Morbi Bridge Collapse : पर्यंटकांचं आकर्षणाचं केंद्र ठरला ‘मृत्यू’चा सापळा; प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

गुजरातच्या मोरबी (Morbi News) जिल्ह्यात एक झुलता पूल (Morbi Bridge Collapse) कोसळला असून त्यात १४० जणांचा मृत्यू झाला आहे. नदीत पडलेल्या लोकांचा शोध सुरु असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती गुजरात सरकारनं दिली आहे.

Gujarat Morbi Bridge Collapse : पर्यंटकांचं आकर्षणाचं केंद्र ठरला ‘मृत्यू’चा सापळा; प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

गुजरातच्या मोरबी (Morbi News) जिल्ह्यात एक झुलता पूल (Morbi Bridge Collapse) कोसळला असून त्यात १४० जणांचा मृत्यू झाला आहे. नदीत पडलेल्या लोकांचा शोध सुरु असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती गुजरात सरकारनं दिली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

गुजरातमधील (Gujrat News) मोरबीमध्ये काल सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत १४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे ४०० हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान, ५ दिवसांपुर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता. यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.

मोरबीतील मच्छू नदीवर बांधलेल्या हा झुलता पूल एक, दोन वर्ष नाही, तर तब्बल १४० वर्ष जुना आहे. मोरबी येथील मच्छू नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचं बांधकाम १८८०मध्ये पूर्ण झालेलं. त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बनवण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च झाले होते. या पुलाच्या बांधकामाचं सर्व साहित्य ब्रिटनमधून आलं होतं. बांधकाम झाल्यापासून ते दुर्घटनेपूर्वीपर्यंत या पुलाची अनेकवेळा डागडुजी करण्यात आली आहे. या पुलाची लांबी ७६५ फूट होती. तर हा पूल १.२५ मीटर रुंद आणि २३० मीटर लांब होता. हा पूल भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाही साक्षीदार आहे. या पुलाचा इतिहास सुमारे १४० वर्षांचा आहे. गुजरातच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक येत असतात. या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा झुलता पूल आहे. ऋषिकेशमधील राम आणि लक्ष्मणाच्या झुल्यासारखाच हा पूल होता. त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं लोक यायचे. रविवारी या पुलावर ५००-७०० लोक एकत्र जमल्यानं पुलाला भार सहन झाला नाही आणि पूल कोसळून नदीत पडला.

गेल्या ६ महिन्यांपासून हा पूल दुरूस्तीमुळे सर्वसामान्यांसोबतच पर्यटकांसाठी बंद होता. २५ ऑक्टोबरपासून तो पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात आला. या ६ महिन्यांत पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. या पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओधवजी पटेल यांच्या मालकीच्या ओरेवा ग्रुपकडे आहे. ओरेवा ग्रुपनं मोरबी नगरपालिकेसोबत मार्च २०२२ ते मार्च २०३७ असा १५ वर्षांसाठी करार केला आहे. या कराराच्या आधारे या पुलाची देखभाल, स्वच्छता, सुरक्षा आणि टोल वसुली या सर्व जबाबदाऱ्या ओरेवा ग्रुपकडे आहेत.

पुलाची देखभालदुरुस्ती करणाऱ्या कंपनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच अधिक चौकशीसाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आली आहे. १०० जणांची क्षमता असलेल्या पुलावर दुर्घटनेवेळी ४०० जण उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचावकार्यासाठी तातडीनं पथकं पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात एक ट्वीट देखील केलं आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदी घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, अन्यथा होणार दंडात्मक कारवाई

Maharashtra Politics : ‘वर्षा’ वर तब्बल अडीच तास बैठक; बच्चू कडू-रवी राणा वाद मिटला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version