हमासवर विश्वास नाही – इस्रायली संरक्षणमंत्र्यांचा दावा

गाझा पट्टीमध्ये इस्रायल लष्कराने केलेल्या हल्ल्यात 11,240 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4630 मुलांचा समावेश आहे. गाझावरील हल्ल्यानंतर अनेक दिवसांनी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी दावा केला आहे की, हमासचे गाझावरील नियंत्रण सुटलं आहे. 16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील प्रभुत्व संपुष्टात आलं आहे. आता पॅलेस्टाईनच्या नागरिकांना हमासवर विश्वास नाही. गाझामधील नागरिक हमासचे तळ लुटत आहेत.

हमासवर विश्वास नाही – इस्रायली संरक्षणमंत्र्यांचा दावा

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या वणव्याची धग कायम आहे. या संघर्षाला एक महिना उलटून गेला असला, तरी हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गाझा पट्टीचून हमासचं नायनाट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नसल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत हल्ले सुरुच आहेत. आता इस्रायल लष्कर हवाई मार्गासह गाझामध्ये घुसून हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहे. दरम्यान, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नागरिकांचा आता हमासवर विश्वास राहिलेला नाही, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केला आहे. गाझातील नागरिक आता हमासचे तळ लुटत आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे.

इस्रायल-हमास युद्ध सुरुच
गाझा पट्टीमध्ये इस्रायल लष्कराने केलेल्या हल्ल्यात 11,240 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4630 मुलांचा समावेश आहे. गाझावरील हल्ल्यानंतर अनेक दिवसांनी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी दावा केला आहे की, हमासचे गाझावरील नियंत्रण सुटलं आहे. 16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील प्रभुत्व संपुष्टात आलं आहे. आता पॅलेस्टाईनच्या नागरिकांना हमासवर विश्वास नाही. गाझामधील नागरिक हमासचे तळ लुटत आहेत.

’16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील नियंत्रण संपलं’
एएफपीच्या वृत्तानुसार, इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी दावा केला आहे की, “हमासचा गाझावर 16 वर्षांपासून ताबा होता. पण, हमासने आता गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावलं आहे. त्यामुळे हमासचे दहशतवादी पळ काढत आहेत. हमासचे दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत. हमासचे तळ नागरिकांनी उद्ध्वस्त केलं आहेत. नागरिक हमासच्या तळांना लक्ष्य करत लूटमार करत आहेत. गाझातील नागरिकांचा सरकारवर विश्वास नाही.”

अल-शिफा हॉस्पिटलमधून वाईट बातमी
गाझाचे सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफा काही दिवसांपासून युद्धाचं केंद्र बनलं आहे. इस्रायलने या हॉस्पिटलवर हल्ला केल्याचा आरोप हमासने केला आहे. पण इस्रायली लष्कराने रुग्णालयाच्या आसपास हमासच्या दहशतवाद्यांवर लक्ष्य करत असल्याचा दावा केला आहे. अल-शिफा या गाझाचे सर्वात मोठे रुग्णालयामध्ये हमास कमांड सेंटर चालवत असल्याचा दावा इस्रायल लष्कराने केला आहे.

 

गाझामध्ये दररोज 4 तासांची शस्त्रसंधी
दरम्यान, इस्रायलने म्हटले आहे की, उत्तर गाझामधील त्यांच्या ग्राउंड ऑपरेशन्सवर दररोज चार तासांचा युद्धविराम लागू करण्यात येईल, यामुळे येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर जाण्याची संधी मिळेल. या युद्धामुळे जगभरात इस्रायलविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. युद्ध थांबवण्यासाठी त्याच्यावर सतत दबाव टाकला जात आहे. पण, पॅलेस्टिनी संघटना हमासचा अंत केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नसल्याचं इस्रायलने आधीच स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा : 

तुम्हीही दिवाळीत खूप गोड पदार्थ खात आहात? मधुमेह वाढला आहे की नाही हे अशा प्रकारे समजू शकते

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, ‘या’ तारेखला होणार प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version