Happy New Year ‘या’ देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

Happy New Year ‘या’ देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

किरिबाटी (Kiribati) हे पॅसिफिक राष्ट्र न्यूझीलंडसह (Pacific nation of New Zealand) शेजारी देशांपेक्षा एक तास पुढे २०२३ मध्ये नवीन वर्षाचे स्वागत करणारा पहिला देश बनला. न्यूझीलंडनेही फटाक्यांची आतषबाजी करून आणि मोठ्या दिमाखात नवीन वर्षाची सुरुवात केली.

भारताआधी (India) नव्या वर्षाचं स्वागत पूर्वेकडील देशात करण्यात आलं आहे. भारतीय प्रमाणवेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे असलेल्या देशांत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. या जल्लोषाचे व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाले आहेत. फटाके वाजवत तेथील नागरिकांनी जल्लोष केला आहे. दरम्यान, न्यूझीलंड आणि ऑकलंडमध्ये (New Zealand and Auckland) नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. न्यूझीलंडमध्ये सध्या मध्यरात्रीचे १२ वाजून गेले आहेत. तर तेथील उंच टॉवरवरून फटाके फोडण्यात आले आहेत. तेथील प्रमाणवेळ भारतीय वेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे आहे.

आज सर्वत्र थर्टीफर्स्टच्या (Thirtyfirst) निमित्ताने उत्साह पाहायला मिळेल. त्याच पार्श्वभूमीवर शहरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. पोलिसांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच तळीरामांवर नियंत्रण रहावे, यासाठी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त असणार आहे. शहरालगतच्या निर्जनस्थळीही पोलिसांची वाहने पेट्रोलिंग करणार असल्याची माहिती आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री नऊपासून शहरात जागोजागी बंदोबस्त राहणार आहे. पहाटेपर्यंत पोलिस जागोजागी नजर ठेवणार आहेत. शहरात ३३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील अठरा हॉटस्पॉवर अनुचित घटना होऊ नये, या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिसांनी हद्दपारीतून परत आलेले १२६ मक्काची शिक्षा भोगून परत आलेले ५४ व एमपीडीएअंतर्गत शिक्षा भोगलेल्या ९७ गुन्हेगारांचा आढावा घेतला आहे.

हे ही वाचा:

Happy New Year 2023 कुटुंबासह घरी बनवा बार्बेक्यूच्या मदतीनं स्वादिष्ट पनीर टिक्का, पहा रेसिपी

New Year celebration साठी कोहली कुटुंब पोहोचलं दुबईला,अनुष्का विराटचे आणि वामिकाचे सुंदर फोटो आले समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version