Hathras Stampede: PM Narendra Modi यांनी केल्या भावना व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

Hathras Stampede: PM Narendra Modi यांनी केल्या भावना व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

उत्तर प्रदेश मधील हाथरस (Hathras Stampede) येथे सत्संग कार्यक्रमा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे तब्बल ८० हुन अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सत्संगदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्दैवी घटनेवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांच्यासोबत फोनवरून चर्चा करत माहिती घेतली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत म्हणाले, “उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोललो. उत्तर प्रदेश सरकार सर्व पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यात गुंतले आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझी सहानुभूती आहे. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो.”

यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत २ लाख रुपये प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर आपल्या भावना मांडल्या. आपल्या ‘X’ अकाऊंटवरून ते म्हणाले, “हातरस जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर राबवून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.”

ते पुढे म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, संदीप सिंह घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. एडीजी, आग्रा आणि अलिगढचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दिवंगत आत्म्यांना त्यांच्या चरणी शांती लाभो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना.”

हे ही वाचा:

Hathras Stampede : सत्संगात झाली चेंगराचेंगरी ; ७० ते ८० जणांनी गमावला जीव

PM Modi यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, ‘मी काही लोकांच्या वेदना समजू शकतो’…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version