Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Hathras Stampede : सत्संगात झाली चेंगराचेंगरी ; ७० ते ८० जणांनी गमावला जीव

जिल्हाप्रशासन कार्यवाही करत आहे. जे घायाळ आहेत अशा लोकांनां इस्पितळात घेऊन जाण्यात येत आहे. मृत्युमुखींची नक्की अशी संख्या सांगता येन कठीण आहे. तरी अंदाजे ८० ते ९० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. एटा येथील जिल्हा रुग्णालयात २३ महिला आणि २ लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना भोलो बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात झाली.

ताज्या माहितीनुसार आयोजकांकडून सांगण्यात आलेल्या संख्येपेक्षा जास्त लोक घटनास्थळी आले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अनेकांना त्रास झाला आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. हा सत्संग एका प्रायव्हेट संघटनेने आयोजित केला होता.

हे भोलेबाबा नक्की कोण आहेत ?

ज्या भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात ही घटना घडली ते एकेकाळी पोलिस विभागात काम करत होते. नोकरी सोडून त्यांनी प्रवचन करण्यास सुरुवात केली. एटा जिल्ह्यातील पटियाली गावातील रहीवासी साकार विश्व हरी हे पुढे भोले बाबा झाले. पोलिस दलातील गुप्तचर विभागात ते काम करत होते. काही वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी राजीनामा दिला आणि भक्तांच्या सेवेचे काम केले. भोले बाबा पत्नीसह सत्संग कार्यक्रम करत होते. त्यांचे सत्संग ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात.

भोले बाबांचा सत्संग याआधी देखील चर्चेत आला होता. करोना काळात भोले बाबांनी सत्संगासाठी फक्त ५० लोकांना सहभागी होण्याची परवानगी मागितली होती. पण प्रत्यक्षात सत्संगासाठी ५० हजारहून अधिक लोक आले होते. प्रचंड संख्येने आलेल्या भक्तांमुळे प्रशासनाची धावपळ झाली होती. यावेळी देखील कार्यक्रमासाठी जितके लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते त्यापेक्षा जास्त संख्येने लोक आल्याची चर्चा आहे.

भोलेबाबा यांच्या सत्संग दरम्यान झालेल्या या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा गर्दीच्या व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. मर्यादीत लोकांसाठी परवानगी घेऊन मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे आता शासनाने या प्रकरणातील मृत्युमुखिंना २ लाख रुपयांची मदत जाहीर कारवी अशी मगणी होत आहे.

काय म्हणाले DM आशिष कुमार ?

“हाथसरमध्ये , तहसील सिकंदर येथील एका ठिकाणी भोलेबाबा यांचा सत्संग झाले. हा सत्संग संपत होता तेव्हा अत्याधिक गर्दीमुळे तेथील लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. जिल्हाप्रशासन कार्यवाही करत आहे. जे घायाळ आहेत अशा लोकांनां इस्पितळात घेऊन जाण्यात येत आहे. मृत्युमुखींची नक्की अशी संख्या सांगता येन कठीण आहे. तरी अंदाजे ८० ते ९० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  याची परवानगी SDM द्वारे देण्यात आली होती. त्याचप्रमाणे हे खासगी आयोजन होते. या संदर्भात एक मोठी उच्च कमिटी बसवण्यात आली आहे. याच सोबत जिल्हाप्रशासनाने सध्या जे जखमी व मृत्युमुखी पडलेला जो जनसमुदाय आहे त्याला शासकीय मदत करणे ही प्राथमिकता शासनासमोर आहे.”  अशी प्रतिक्रिया DM आशिष कुमार (Ashish Kumar) यांनी दिली आहे.

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss