चक्क ८ किलोचा बाहुबली समोसा बघितला का कधी?, खाल्ल्यास मिळणार ५१ हजारांचं बक्षीस

चक्क ८ किलोचा बाहुबली समोसा बघितला का कधी?, खाल्ल्यास मिळणार ५१ हजारांचं बक्षीस

जर तुम्ही समोसा प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सोशल मीडियावर खाद्यपदार्थ आणि फराळाचे खूप मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असले तरी आज आम्ही तुम्हला असा समोसा दाखवणार आहोत, जो तुम्हाला त्याच्या चवीने वेड लावण्यासोबतच तोच सामोसा तुम्हाला श्रीमंत देखील बनवू शकतो. हा व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ८ किलो वजनाचे समोसे दिसत आहेत, ज्याचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे.

या व्हिडीओमध्ये एका ट्रेमध्ये समोसा घेऊन युवती दिसते. ती हा समोसा दाखवित आहे. याचे दोन भाग केले आहेत. त्यापैकी एक भाग तीनं उचलून दाखविला. तो सुमारे चार किलोचा आहे. या समोसासोबत दोन प्रकारच्या चटणीही ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : 

विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने उर्वशी भडकली, म्हणाली- मुलीसोबत असं झालं तर?

हा व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि आश्चर्यचकित झाले आहेत की तो कसा बनवला गेला असेल. त्याच वेळी काही लोक त्याची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा समोसा प्रथमच जुलैमध्ये उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मिठाईच्या दुकानात तयार करण्यात आला होता, त्यानंतर त्याची मागणी वाढतच गेली. हा ‘बाहुबली समोसा’ आठ किलोचा आहे, ज्यामध्ये बटाटे आणि चीज मिळेल.

या समोसाची किंमत १ हजार १०० रुपये ठेवण्यात आली आहे. आणि हो विशेष म्हणजे समजात तुम्ही हा समोसा खात असाल, तर त्यासाठी बक्षीसही ठेवण्यात आलंय. हे बक्षीस खूप मोठं आहे. म्हणजे ५१ हजार रुपयांचं बक्षीस समोसा खाण्याऱ्यासाठी ठेवण्यात आलंय. पण, हा समोसा आठ किलो वजनाचा असल्यानं सहसा कोणी खाण्याची हिंमत करणार नाही, असं दिसते.

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या बोल्ड फोटोमुळे इंस्टाग्रामचं टेंपरेचर वाढले

Exit mobile version