या आंब्याची किंमत ऐकून भुवया होतील आश्चर्याने उंच …

आंबा हा फळांचा राजा मानला जातो. उन्हाळ्यात सर्वचजण मनोसोक्त आंबे खाऊन घेतात. अनेकजणांना आंबे प्रचंड आवडतात.

या आंब्याची किंमत ऐकून भुवया होतील आश्चर्याने उंच …

आंबा हा फळांचा राजा मानला जातो. उन्हाळ्यात सर्वचजण मनोसोक्त आंबे खाऊन घेतात. अनेकजणांना आंबे प्रचंड आवडतात. भारतीय आंबे हे परदेशात देखील प्रसिद्ध आहेत. भारतात अनेक प्रकारच्या आंब्याच्या जातीचे उत्पादन घेतले जाते. भारतात विविध राज्यातील आंब्याची एक वेगळीच विशेषतः आहे. भारतातील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. हापूस आंब्याची चव घेण्यासाठी लोक वेडे होतात. हापूस सोबतच आंब्याचे अनेक प्रकार आहेत. दसरी, रायवळ, लंगडा अशी आंब्याची अनेक नावे तुम्ही ऐकून असाल अथवा तुम्ही हे आंब्याचे प्रकार खाल्ले सुद्धा असतील. मात्र तुम्ही कधी पाच किलोच्या आंब्याबद्दल ऐकले आहे का?

एका आंब्याचे वजन साधारण १५० ग्रॅम इतके असते. पाच किलोच्या आंब्याला नूरजहाँ असे म्हंटले जाते. पाच किलोच्या आंब्याचा आकार हा प्रचंड मोठा असून हा आंब्या त्याच्या विशेष आकारासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर नूरजहाँ या आंब्याला आंब्याची राणी असे म्हंटले जाते. हा आंब्याचा प्रकार भारतासह परदेशातही प्रसिद्ध आहे. ही एक आंब्याची विशेष प्रकारची जात असून या आंब्याचे वजन हे साधारण ३ ते ५ किलो असते. या आंब्याचं प्रजातीच मूळ हे अफगाण आहे. अफगाणी प्रजातीच्या आंब्याचं उत्पादन हे भारत देशातील मध्य प्रदेश या राज्यात घेतले जाते. नूरजहाँ आंब्याच्या जातीच्या झाडाची अगदी योग्यप्रकारे काळजी घ्यावी लागते. या आंब्याच्या विशेष प्रजातीचे उत्पादन हे मध्यप्रदेशातील इंदोर मधील कठ्ठीवाडा या भागात घेतले जाते. या आंब्याचे चांगले उत्पादन येण्यासाठी या प्रजातीच्या झाडांची भरपूर काळजी घ्यावी लागते. एका माहितीच्या आधारे नूरजहाँ आंबा १५ जूनपर्यंत पिकण्यास तयार होऊन जूनच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतो.

नूरजहाँ हा आंबा विशेष आकाराचा असून याचे वजन भरपूर प्रमाणात असते. वजनाप्रमाणे या आंब्याची किंमत देखील भरपूर प्रमाणात आहे. नूरजहाँ आंबा खरेदी करण्यासाठी तुम्हाला २००० रुपये मोजावे लागतील. हा एक विशेष आंबा असून त्याच्या आकाराची जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे या आंब्याची चव घेण्यासाठी तुम्हाला २००० रुपये खर्च करावे लागतील.

हे ही वाचा:

शिवसेनेकडून जाहिरातबाजी : कोणता नेता आहे अधिक लोकप्रिय ?

डेलीहंट, वनइंडिया आणि दिल्ली पोलिस नागरिकांना सक्षम करण्यासाठी सहयोग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version