देशामध्ये बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

देशामध्ये मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे.

देशामध्ये बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

देशामध्ये मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. परंतु, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. डोंगराळ भागामध्ये पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागांमध्ये उद्यापर्यत म्हणजेच ३० जूनपर्यत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दिल्लीमध्ये ४ जुलैपर्यत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातही IMD ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. राज्यामध्ये सतलज नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि काही जणांचा मृत्यू देखील झाल्याची घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना भीतीने वातावरण पसरले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमध्ये आज हवामान विभागानं काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच मध्य प्रदेश आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, झारखंडमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हे ही वाचा:

तुम्ही नवजात बाळाच्या आई आहात? तर पावसाळ्यात तुमच्या लहानग्यांची घ्या काळजी…

Smriti Irani यांचा Rahul Gandhi यांच्यावर मोठा आरोप, म्हणाल्या…

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत तर एकाचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version