Heeraben Modi passed away : हीराबेन मोदींच्या निधनानंतर मोदींच भावुक ट्विट, शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.

Heeraben Modi passed away : हीराबेन मोदींच्या निधनानंतर मोदींच भावुक ट्विट, शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम…

Heeraben Modi passed away :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. आईच्या निधनाचं वृत्त स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… असं मोदी यांनी आईच्या निधनाचं ट्विट करताना म्हटलं आहे. तसेच त्यांनी आईबद्दलच्या आठवणीही जागवल्या आहेत.

त्यानंतर मोदी यांननी दुसऱ्या ट्विटमध्ये आईविषयीची भावना व्यक्त केली आहे. या ट्विटमधून मोदी अत्यंत भावूक झालेले दिसत आहेत. आईचा 100वा वाढदिवस होता. त्यावेळी मी तिला भेटलो होतो. त्यावेळी तिने मला एक मंत्र दिला. तो मला नेहमीच स्मरणात आहे. काम बुद्धिने करा आणि जीवन शुद्धीने जगा, असं आई म्हणाली होती, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

PM Narendra Modi Mother : पंतप्रधान मोदींनी आईसाठी लिहिला होता इमोशनल ब्लॉग, ‘आईचं अस्तित्व नसणं…

Narendra Modi’s mother Hiraben Modi passed away नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version